पान:बाळमित्र भाग २.pdf/२७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७५ भागीरथी. ही तुला सांगावयाचे आहे. भागी०- आहा ! ते तर मला फार चांगले आवडते, आणि ते मला गोपाळाच्या मुलीने शिकविले आहे. आई- गोपाळाचे मुलीपेक्षा मला दोन कांकणे अधि. क कळते. तिचें माझें सांगणे एक सारखें पडणार नाहीं खरेंच. भागी.- कालरात्री मी हिला घेऊन आरशांत पाहू- न नटू लागले तेव्हां मला असे वाटले की मी फा. रच चांगली दिसते. आई- काय, तुला असे वाटले की साधेपणानें अ. • सण्यापेक्षां नटणे मुरडणे फार चांगले आहे १ पण ह्याचा परिणाम काय होईल हे तुला माहीत नाही मला, बाई, वाटने की साधेपणाने असावे हे चांगले. भागी०- पुढे ह्याचा परिणाम काय होईल बरें १ . आई- परिणाम हाच की अशी तुला रोज रोज सं- वय लागून हेच करावे असे वाटत जाईल. मग लोक नांवें ठेवितील, आणि ज्या कुलीन स्त्रिया आहेत त्या तुझी संगत धरणार नाहीत. भागी०- काय आई १ तूं ह्मणतेस असे होईलना १ ही गोष्ट त्वां मला आतांच सांगितली ह्मणून बरे झालें, नाही तर मला तोच चटका लागला असता. आई- माझे मनांत तं भोळी आहेस, मणन मी तुला सांगितले; तूं पुनः जर असे ढंग करशील तर म. ग कधीच मी तुझें तोंड पाहणार नाही. ह्यावरून.