पान:बाळमित्र भाग २.pdf/२८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७६ बाळमित्र. च पहा की भलत्याचे ऐकून किंवा पाहून केल्या. में केवढा अनर्थ होतो तो! आपणाला चांगले अ. सावे असे जर तुझ्या मनांत आहे तर मला वि. चारीत जा. भागी०- आई, मी तुला वचन देते की आजपासून तुझ्या आज्ञेशिवाय काही करणार नाहीं; तूं सां- गशील ते माझ्या बऱ्याचेच सांगशील, हे मला प. के समजते. तूं एखादे वेळेस लहानशा अपराधा- करितां सर्व मंडळी देखतां माझा कान गचितेस, तसें जर ह्यागोष्टी करितां सगळ्यां देखत मला फ. जीत करितीस तर मी लाजेने मरून गेले असते. आई- माझे बोलणे तुझ्या मनांत पक्के ठसावें ह्मणून मी चौघांत तुला बोलतें, पण आतां एक दुसरा उपाय आहे तो असा की, जेव्हां चौघां देखत कां. ही बोलावयाचे आहे तेव्हा मी तुला खूण करीत जाईन त्याप्रमाणे तूं वागत जा; कदाचित् ती खूण तुझ्या लक्षांत नआली तर मला वेगळ्या वाटेनें विचारीत जा, झणजे मी तुला उमजून सांगेन. भागी०- आई, त्वां फार चांगले शिकविलें; ही यु- क्ति खाशी आहे. याप्रमाणे मी वागले तर माझें कल्याणच होईल. त्या दिवसापासून कोणतेही बरे वाईट करणें तें भागीरथी आपले आईस विचारून करीत गेली. थोड- क्याच दिवसांत आईच्या झाडून साऱ्या खुणाखाणा