पान:बाळमित्र भाग २.pdf/२८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भागीरथी तिच्या ध्यानात आल्या, आणि आईच्या शिकवणी प्रमाणे ती वागू लागली; ह्यामुळे तिच्या ज्या समवय- स्क मुली होत्या त्यांमध्ये ती शाहणी व मोठी खबर. दार अशी निवडली; हे पाहून सर्व लोक वाव्हा वाव्हा करूं लागले, आणि ह्या लोकांतली जी मुखें आहेत नी तिला मिळाली. ती हींच की, आईबापांची प्रीति व सर्व लोकांची प्रीति आणि अंत:करणाचे समाधान इतकी तिला प्राप्त झाली. दिवाळखोरास दुप्पट शिक्षा. एके सगृहस्थाने पाहिले तो आपला मुलगा दुर्व्य- सनांत पडून द्रव्य उधळीत आहे, तेव्हां त्याने पुत्रास काही दिवस तसेंच वर्तुं दिले. नंतर थोडक्याच दिव- सांत तो पुत्र कर्जभरी झाला असे पाहून त्याने पुत्रास बोलावून आणून सांगितले की, बाबारे, आतां माझें तर मातारपण झाले, मला द्रव्यापेक्षा प्रतिष्ठा फार प्रिय आहे, ती न जावी ह्मणून मी तुला सांगतों, तूं जितके कर्ज काढशील तितक्याचा ही फडशा मी करीन, परंतु मी बोलतों ह्या गोष्टीची पुरती आठवण ठेव. तूं ख्याली- खुशालीवर प्रीति ठेवितोस आणि मी गरीब दुबळे ह्यांजवर प्रीति ठेवितों, तर तूं द्रव्य उधळू लागल्यापा-