पान:बाळमित्र भाग २.pdf/२८२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२७८ बाळमित्र. सून मी नेमापेक्षां फार कमी धर्म केला, परंतु विचार पाहतां हे नीट झाले नाही. सास्तव आजपासून मी असे कधी करणार नाही, तर काय करीन ९ पक्के ध्यानांत ठेव, तूं आपले इच्छेप्रमाणे बेलाशक द्रव्य उधळीत जा, आणि तुला चालीप्रमाणे खर्चास जितकें मी द्रव्य देत असतो त्याहून ज्यास्ती त्वां खर्च केला झणजे त्याबद्दल तितकेंच द्रव्य मी एखादे धर्म कृत्याक- डे खर्च करीन; हाच प्रारंभ आजपासून केला आहे. माझे काय ? दाहा गेले आणि पांच राहिले, परंतु ये. णेकरून तुझेंच द्रव्य कमी होईल; मी तर उद्यां मर- णार पण तूं मात्र आपला विचार पहा. बापाने तसे करतांच पुत्र आपल्या उधळल्या द्रव्या- ची दुप्पट शिक्षा पावून लौकर शुद्धीवर आला. असे नसते तर त्याचे बापाचे द्रव्य लौकर लयास गेले असते. लहान जुगारी. नाटक एक अंकी. पात्रे, . . . . . . . कोणी गृहस्थ जयरामाचा पुत्र. .. जयरामाची कन्या. जयराम . . . . . . . . माधव .. राधा ....