पान:बाळमित्र भाग २.pdf/२८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान जुगारी २७९ शिवराम • • .. ..... माधवाचा मित्र. गोविंदा ................ माधवाचा शेजारी. विठू दाजी ....... पैजेचे खिलाडू. तात्या) स्थल जयरामाचा बाग. प्रवेश १, शिवराम आणि गोविंदा. शिव०- तुला माधवाचे घरी जावयाचे काय काम आहेरे? गोवि०- काही बोलावयास त्याचे येथे जावयाचे आहे, पण तूं त्यास वळखतोस १ शिव.- होय, त्याची आणि माझी उगीच तोंड ओ- ळख आहे; पण अगोदर कधी तुझी त्याची इतका ओळख नव्हती. गोवि.- त्याचे शेजारी माझे बापाने बि-हाड घेतले तेव्हांपासून मी त्याची सोबत धरिली आहे, काल रात्रीस मी न्याजबरोबर गंजिफा खेळत होतो. शिव.- आतांशी त्वां गंजिफांवर बरेंच ध्यान धरले आहे. मी तुला दाजी, विठू, ह्यांचे संगती फार वे. हां पाहिले, पण हे चांगले नव्हे.