पान:बाळमित्र भाग २.pdf/२८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०० बाळमित्र. गोविं.- एकून तूंही त्यांना ओळखून आहेस, मला तर, बाबा, त्यांची संगत नको; एकदा सुटती तर बरें होतें. शिव.- पण ते तुझ्या मनात येईल तेव्हांना तूं त्यांची -संगत सोडशील १ गोविं०- ते माझ्याने आजच करवत नाही, पण मी तुला एखादी गोष्ट जर सांगितली तर तूं कोठे फो. डणार तर नाहीस १ parms शिव०- तूं संशय कां धरितोस ९ तूं नि मी काही आजकालचे मित्र आहों ? गोविं०- काय सांगू, शिवरामा! त्यांनी मला फार ना- डले, ह्मणून मी पैज केली, पण ते जर का माझ्या बापास कळले तर तो मला घराबाहेर हांकून ला. वील. काय सांगू? मला क्षणभर देखील चैन नाही. शिव.- ती पैज कशी काय आहे बरें। गोविं०- त्यांनी मला काल एके ठिकाणी फसवून नेले, तेथें तात्या ह्मणून एक पोरगा होता, तेव्हां तो आह्मी सारे गंजीफा खेळू लागलों, न्यांत म्यां आपले सारे पैसे हारविले. शिव०- त्यांनी काही दगाबाजी केली असेल ह्मणून तूं फसलास; तुला सांगतों, झाले ते बरेच झालें, तुझें कांही फारसें गेलें नसेल. इतःपर मात्र तूं त्यांशी कद्धी खेळू नको, मणजे झाले. आतां जे तुझें नु-