पान:बाळमित्र भाग २.pdf/२८५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान जुगारी २८१ कसान झालें तीच तुला हितावह शिक्षा झाली अ. से समज. गोवि०- पण अझून म्यां तुला कांहींच हकीकत कळविली नाही, अगोदर पुरतें ऐक. जों जों मी हरत गेलों तों तों मिळवीन मिळवीन ह्या लालचीने अधिक अधिक खेळत गेलो, तो दोन मोहरा, चा- कू, कातर, पागोटें, वगैरे में काय माझे जवळ हो- ते ते म्यां सर्व हारविले. इतकेंही जाऊन आणखी तात्यास एक मोहर द्यावयाची राहिली आहे, ती कसेही करून दिली पाहिजे. न देईन तर तो बा. पास जाऊन सांगणार आहे. शिव०- आतां तुला एक मसलत सांगतो. तूंच अगो. दर जाऊन आपले बापास सांग झणजे झाले. तो तुला रागें भरणार नाही हे मला पके ठाऊक आहे. गोवि.- ते तर मी प्राण गेल्याने करणार नाही. शिव- तर मग काय करशील ? गोविं.- तें तुला सांगावयास मला धैर्य होत नाही. शिव०- मजपाशीं सांगावयास काय चिंता आहे १ का- य ते मला ऐकू तर देशील ? गोवि- दाजी, विठू, ह्यांस मी सांगितले की आतां माझा उपाय नाही तेव्हां त्यांनी मला एक युक्ति सांगितली. शिव.- अहा त्यांची युक्तिनाः फारच खाशी असेल.