पान:बाळमित्र भाग २.pdf/२८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८२ बाळमित्र. गोवि०- ह्यांत कांहीं भलमनसाई नाही, पण मी तरी __ कसे करावें, दाजी, विठू, ह्यांजकडे मला माधवान नेले पाहिजे, कांकी त्याजवळ पैसे फार आहेत. शिव.- त्याचे पैसे तूं चोरून घेणार की काय? गोविं०- ईश्वर करो की मजकडून असें नहोवो, इत- केंच की, तात्याने जसे मला केले तसे तो माधवास ही करणार आहे. मग वाटणी होईल, असा युक्ती. ने मी कर्जातून मुक्त होणार आहे. शिव.- त्यांनी जसें तुला ठकविलें आहे, तसें तूं आ. पल्या मित्रास फांशांत घालणार आहेस, पण माधव हारेलच हे तरी कशावरून ह्मणतोस ? गोविं०- होय, होय, तो अकृत्रिमपणे खेळतो खरा. शिव.- आणि तूं लबाडीने खेळतोस काय ? गोवि.- काय लबाडीने मी कधी तरी लबाडी करीना शिव०- नाही, नाही, तुझी खेळण्यांत लबाडी कधीच आढळली नाही, ह्मणूनच तूं बुडालास, पण आता- ही खरेंच खेळशील तर मग त्याला कसे जिंकशील' गोवि.- कसे जिंकावें हे मला माहीत नाही, पण व्यांनी सांगितले की जिंकावयाची एक युक्ति आहे त्या युक्तीने खचीत जिंकू. शिव- त्यांची युक्ति लबाडीची आहे, पण तूंही त. शीच युक्ति करणार की काय १ मी इतका गरीब आहे तरी अशी युक्ति करून कधी पैसे मिळविणार नाही. तुझा अभिप्राय पाहून मला फार खेद वाटतो,