पान:बाळमित्र भाग २.pdf/२८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान जुगारी गोविं- हे काय, बरें, शिवरामा, तूं मजवर कृपा क- रूंन मला सहाय हो, ह्मणजे मी प्रतिज्ञा करीन- शिव०- प्रतिज्ञा ! त्वां कशीही प्रतिज्ञा केली तरी मी तुला कधी सहाय होणार नाही. गोविं.- असे नव्हे, मी बोलतों की ह्या लबाड ता- त्याचे पैसे कसे तरी एकदा फेडल्यावर त्याची किं. वा त्याच्या सोबत्यांची संगतं सोडून देईन, आणि पुन्हां कधी गंजीफा हातांत धरणार नाही, ही प्र. तिज्ञा मी करितो. असे जर न केले तर मग तूं माझ्या बापाजवळ सांग. माधवास ठकवावे हे मा- झ्या मनांत नाही, आणि कसें ठकवावें हेही म. ला ठाऊक नाही. ठकवावयाचे काम तात्याकडे. मी आपला उगीच सोबती खेळणारा मात्र, त्यांनी मला वचन दिले आहे की आह्मी तुला कदापि हारूं देणार नाही, आणि जितके पैसे मिळतील त्यांतून तुला वांटा देऊ. शिव०- बरें तर मीही तुझ्या मंडळीत मिळतो. गोवि०- ठीक आहे, मी आतांच माधवास बोलावून आणतों. त्याचा बाप कोठे दुसरे गांवी गेला आहे, तो एक महिनाभर यावयाचा नाही. शिव-पण तुझ्या ध्यानांत इतके असूं दे. तूं हो- ऊन आंगे जर माधवास ठकविशील तर- गोवि०- असे झणूं नको, मी तुजशी बोललो नसतों तर बरें होतें..