पान:बाळमित्र भाग २.pdf/२८९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान जुगारी २८५ खचीत सांगतों की तुला बाप आला ह्मणून संतोष वाटत नसेल. माघ.- तो वीस दिवसांनी गांवाहून आला आहे, तेव्हां संतोष कसा वाटणार नाही १ गोवि - माझे आईबापांची मला आवड आहे, पण ते जर कोठे बाहेर गेले तर मला वाईट वाटणार नाही. माधा- माझ्या आईबापांची मला इतकी आवड आ- हे की ते कधी दृष्टी वेगळे झाले तर चैन पडत नाही. गोवि०- माझ्या आईबापांचा मला इतका धाक आहे की अंमळ इकडे तिकडे जातां किंवा खेळतां कामासनये. . शिव.- तुला कोणत्या प्रकारचे खेळणे पाहिजे को- ण जाणे? माध.-ब्वां, आपल्या देखतां तर कधी झणजे तुझ्या बापाने तुला मटले की कोठे जाऊं नको, अगर खेळू नको, हे तर कांही आपण ऐकिलें नाहीं; तु- ला बरीक म्यां बागांत आणि ओट्यावर खेळतां- ना पाहिले आहे. गोविं.- जेव्हां माझा बाप बाहेर जातो तेव्हां मात्र मी तुझ्याशी बोलतों आणि खेळतो. आज तुझा बाप घरी आला, तेव्हां तुला आज रात्री आह्मांब. रोबर खेळावयास फावणार नाही.