पान:बाळमित्र भाग २.pdf/२९०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८६ बाळमित्र. माधo- कां तो येऊ देणार नाही तसे काही नाही. जे काय मी ह्मणतों तें तो पुरवितो, पण म- ला बापाच्या सोबती शिवाय दुसरे कोणाची सोब. त आवडत नाही. गोविं०- अहा, तुझा बाप फार चांगला आहे, जेथे तुझ्या मनांत जावयाचे येते तेथें तो तुला जाऊं देतो; माध०- होय, खरेतें. कोठेही जाणे झाले तर मी बापा. स विचारितों, ह्मणूनच तो मला जाऊ देतो. शिव० - आणि तूंही बापाच्या झटल्याप्रमाणेच अ- 7वश्य वागत असशील गोवि०- बरें, पण बापजवळ असतां तूं आपले मन कसें रमवितोस . माध०- उन्हाळ्यांत व हिवाळ्यांत बाहेर जातों, पावसाळ्यांत आणि जे दिवशी कोठे जावयाचे नसते तेव्हां घरी राहून अधिक विद्याभ्यास करि- तों, व कधी कधी तिघां चौघां बरोबर नाटक खेळत असतो, नाटकावर आमची भारी आवड आहे. गोविं०- पण, अशा कामाने तुला भारी कंटाळा येत असेल असे वाटते. माध०- नाही, नाही, तेणेकरून तर आझांस भारी . आनंद वाटतो. गोवि०- पण त्यापेक्षां गंजीफांचा खेळ फार चांगला आहे नव्हे !