पान:बाळमित्र भाग २.pdf/२९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८७ लहान जुगारी माध०- होय, तो तर माझा बापही खेळतो. गोवि०- कधी वधी रुपयांची पैज लावून खेळत अ- सतोस? माध- होय, थोडीशी पैज लावून खेळतो. ह्याचे कारण असे की खेळण्यांत मन लागावें, ह्मणून बाप ह्मणतो की पैसे हारले असतां राग येऊनये. संवय मात्र लागू देऊनये, इतक्याला जपावें. गोविं.- थोडक्या रुपयांची पैज करून खेळावे हे फार चांगले आहे; कारण की पैक्याचे संरक्षण झाले पाहिजे. माध०- मजजवळ पैसे नाहीत, असे समजूनको; मला खर्चापुरते पैसे मिळून आणखीही मिळतात. गोविं०- किती, कसे, बरें ? माध- दर महिन्यास एक मोहर गोवि०- पण इतके दर महिन्यास मिठाई वगैरे घ्या- वयास मिळतेंना माध०- सारा दिवसभर भातुकलीस पैसे बापाजवळ मागूनयेत ह्मणून एक नेम बांधून ठेविला आहे, पण मी त्यांतच काटकसर करून जमवीत असतो. शिव- खरेच आहे; पदरचे पैसे खर्चावे लागतात, ते. व्हां पाहून पाहून पदार्थ घ्यावे,आणि चार ठिकाणी किमतीची चौकशी करावी, हे चांगलें, ठीकच आहे. माध... खरी गोष्ट ह्मणतोस, शिवरामा, पण असे क. रून पैसे जमा करणार विरळा. पहा मजजवळ आ.