पान:बाळमित्र भाग २.pdf/२९२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८८ बाळमित्र ज पांच मोहरा आहेत. गोवि०- इतके जमलेले पैसे कोठें खर्चशील १ माध०- कां ९ मला खर्च नाही की काय ९ कांहीं आ- वडते पदार्थ विकत घ्यावे लागतात, आणखी मी दु. सऱ्या तन्हेनें खर्चीत असतो. माझ्या चाकराचा मु. लगा आहे त्यास मी शाळेत पाठवितों, आणि मा. झा लहाणपणचा पंतोजी आंधळा आहे ह्मणून मी त्याचे पोटास कांहीं देत असतो, इतकें होऊन बा- की राहिले तर गंजीफा वगैरे खेळण्यांत खचितों. गोविं- गंजीफा खेळण्यांत तुझें दैव फार चांगले आ. हे, थोडे दिवसांमागें त्वां गंजीफांचे खेळांत माझा एक रुपया जिकला होता. माध०- मला ते फार अवघड वाटते. मित्राचे पैसे जि. कून घेतले असतां ते सर्वदा मनांत डाचीत असते. गोविं०- बरें, तर, ते पैसे खर्च करण्याची तुला त- शीच कांहीं एक हिकमत सांगेन, पण आजरात्रीस तुला कांहीं काम आहे १ माध.- नाही, नाहीं, मी रिकामाच आहे; आज मा. झा बाप एक्या गरीब बायकोची अर्जी लिहिणा- र आहे. गोविं०- बरेंच झालें, माझाही बाप आज संध्याका- ळी बाहेर जाणार आहे, तर तूं माझ्या घरी ये, मी विठू, दाजी, आणि तात्या ह्यांस बोलावीन. माध०- बरें तर, मी आपल्या बापास विचारून येतो,