पान:बाळमित्र भाग २.pdf/२९४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९० बाळमित्र. वाटले की माझा भाऊही इकडेसच आला आहे. शिव- तो आतांच तर एथन गेला. राधा- त्याला तुझी सोबत असती तर फार बरे होते, तो गोविंदाशी स्नेह करावयास इच्छितो. शिव- त्याचे सोबतीत राहिल्याने माधवाचे अझून तर काही गमावले नाही, पण- राधा- ते खरे; माझा भाऊ फार भोळा आहे, त्याचे मनांत इतर लोक आपल्या सारखेच भोळे असतील, पर ज्यांना तो आपले मित्र करूं ह्मणतो ते तसे नव्हत. ते केव्हां फसवितील ह्याचा विश्वास नाही. गोविंदाची सोबत तुला बरी वाटत नाही हे मला माहीत आहे. शिव०- खरेंच जर विचारशील तर माधवाने गोविंदा- ची सोबत धरूं नये हे मला बरे दिसते. राधा- बहुतकरून असे घडते की नाश झाल्यावर मग माणसांचे डोळे उघडतात, ह्यासाठी प्रथमच सा- वध असावें, शिव.- तूं आपले भावावर प्रीति करतेस हे मी पुर- ते जाणतों, ह्याकरितां मला शिवरामाने सांगितले असे कोणास कळू देऊ नको, पण तुला सांगतों, गोविंदानें तान्यास वचन दिले आहे ह्यासाठी ता- त्याशी किंवा त्याचे सोबत्यांशी आजरात्री खेळं नको ह्मणून माधवास सांग, तो आतां हो अगर ना सांगावयास येणार आहे, ह्मणून मी बसलों