पान:बाळमित्र भाग २.pdf/२९५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान जुगारी २९१ होतो, पण आता मी बाहेर जातो. तो आतां ये. ईल. माधवाचा नि माझा भारी स्नेह आहे ह्याकरितां तुला सुचविणे प्राप्त आहे. प्रवेश ५ माधव आणि राधा. माध०- माझा बाप नुकताच गांवाहून आला ह्मणून मोठे मोठे गृहस्थ त्याला भेटावयास आले आहेत, तेथे फार दाटी आहे ह्याकरितां मला बोलावयास अवकाश झाला नाही. राधा- अशी कोणती मोठी गोष्ट तुला त्यांजवळ वि. चारावयाची होती माध०- मोठीशी काही नाही, मला आपले मित्राचे घरी जावयाकरितां विचारावयाचे होते, राधा- गोविंदाचे घरींना १ माध०- होय. राधा- मी तेव्हांच अटकळ केली, पण ह्यांत कांहीं चांगुलपणा नाही, हे तुला कसे कळत नाही ? माध०- त्याला तूं ओळखतीस ९ . राधा- त्याची चालचर्या पाहूनच मी तर्काने जाणते. माध०- काय, त्याची तुझी नेहमी संगत सोबत आहे का झणून त्याची चाल तुझ्या ध्यानात आली १