पान:बाळमित्र भाग २.pdf/२९६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९२ बाळमित्र.. राधा- तो कोणाचे पंक्तीस बसतो हे पाहूनच त्याची चाल कशी आहे हे मला समजतें, माध०~ मी समजलों, त्याचे सोबतीची मुले वाईट __ आहेत, त्यांतला मीही एक आहे ह्मणून. राधा- तुला नाही, पण तुजपेक्षा त्याचे जुने स्नेही फार दिवसांचे आहेत त्यांस मी लबाड लुच्चे असें नांव ठेविते. माध०- काय ९ ते लबाड आहेत ? राधा- लबाड पर सात लबाड. जे दुसऱ्याचे पैसे फ- सवून घेतात आणि त्या पैशांचा भलताच खर्च क. रितात, त्यांस लबाड ह्मणावयास भय कोणाचें! माध०- ह्यांत त्यांची लबाडी दिसत नाही, कांकी ते दोन घटका गमत करावयासाठी खेळतात आणि पैसे मिळवितात, मग ते आपले इच्छेप्रमाणे खर्च करितात, असें तर आझी देखील करतो. वरकड तूं ह्मणशील की ते पैसे जिंकावयासाठींच खेळतात. तर ते मजबरोबर खेळतांना फार वळेां हारले आहेत. राधा- होय, होय, त्यांनी आपले तांब्याचे पैसे हार- विले आणि तुझे रुप्याचे जिंकले. माध०- बरें तर ह्यांत माझाच नाश झाला, तुझें तर कांहीं गेलें नाहीं? मग उगीच कां माझें डोके उठ- वितेस . मी तुला सुख देतो आणि तूं मला दु:ख देतेस.