पान:बाळमित्र भाग २.pdf/३००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९६ बाळमित्र. आहे, ह्याकरितां कोणतीही गोष्ट मला कळविल्या. वांचून गुप्त ठेवूनये. राधा, तुझ्या भावाचे मित्र तुझ्या मनास कां येत नाहींत १ सांग. राधा - त्यांना गंजिफांचा भारी छंद आहे. माध०- तुला कोणींगे सांगितले, की त्यांना गंजिफां. चा भारी छंद आहे ह्मणून ९ राधा- त्याची काही चिंता नाही, पण गोष्ट खरी आहे. जय- म्यां तुला अगोदरच सांगून ठेवले आहे की, किती एक खेळ फार वाईट आहेत. माध.- माझे मित्र जो खेळ खेळतात तो फार सोपा आहे, त्याचे नांव एकतिशी. जय- तो खेळ कांहीं मला चांगलासा वाटत नाही. माधo- कां नाहीं बरें : दादा, मला वाटते की त्या. पेक्षा दुसरा खेळ चांगला नाही. ज्याला एकति- सांचे आंत अधिक ठिपके मिळतात तो जिकितो. जय०- तुला ठाऊक नाही, हा खेळ दैवावरचा आहे. माध०- खेळामध्ये जिंकणे किंवा हारणे हे प्रारब्धाचे स्वाधीन ही गोष्ट खरीच आहे, पण सर्व खेळ ह्या- प्रमाणेच आहेतना १ जय.- त्यांत अंतर आहे; ह्या खेळांत प्रारब्धावरच सर्व हवाला आहे, एथें बुद्धीचे काम नाहीं; इतर खेळांत शाहाणपणाची गरज आहे. थोडक्यात सां- गतो, दैवापुढे शाहाणपण चालत नाही, ह्यासाठी म. ला असे वाटते की ज्यांत बुद्धीचे कौशल्य अधिक