पान:बाळमित्र भाग २.pdf/३०१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान जुगारी २९७ आहे त्याचे नांव खेळ. राधा- आणि तसल्या खेळांत आपणास संतोष देखी. ल होत नाही, आपणास जी गंजीफ पाहिजे ती न मिळाली झणजे तिची भारी हळ हळ लागते. माध.- असें ह्मणूंनको, त्यांतच काय ती मजा आहे, जी गंजीफ आपणाला पाहिजे असती तिजकडे क- सें भारी लक्ष लागलेले असते! जय०- हा संतोष लोभामुळे उत्पन्न होतो; लोभ मो. ठा अनर्थकारी आहे, ह्या लोभामुळे सहस्रावधि लो- क बुडून जातात, आणि जे ठक आहेत ते अशा खेळांत भोळे प्रमाणीक ह्यांसच बहुत करून ठक- वितात. माध०-हे कसे बरे, दादा राधा- मला वाटते की हुकमा हुकमाची पाने की लावावी ही युक्ति ते जाणत असतील. जय.- होय, हेच खरे, त्यांची ती युक्ति कशी काय आहे हे मला काही माहीत नाही हो; पण आहे खरी, हे मी पक्के जाणतो. कशावरून ९ त्यांच्या त्या युक्तिनें बहुतांचा नाश झालेला मी फार वेळां पा. हिला आहे. माध- त्यांतली एखादी गोष्ट आझांस कळवाना, दादा जय०- बरें, ऐक, सांगतो. मी हैदराबादेस गेलो हो. तो, तेथे एके सावकाराचा तरुण मुलगा होता, त्या-