पान:बाळमित्र भाग २.pdf/३०२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९८ बाळमित्र. ला जुन्याचा छंद लागला, त्यापाशी लाख रुपयां- ची मत्ता होती ती आणि कांहीं वतन वाडी, तित- कीही त्याने जुवेबाजीत हारवून बुडविली, हे मी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिले. राधा- अबाबाबा! लाख रुपये बुडविलेना ९ मग त्या बापड्याची कशी अवस्था झाली असेल ? माघ- तो तर मग वेडाच झाला असावा. जय- तसेच झाले. आपले सर्व ट्रव्य बुडालें असे समजतांच तो वापरा सारखा काळा ठिकर पडला, तेव्हां माझ्याने तर त्याचे तोंडाकडे पाहवेना दे. खील, मग त्या दुःखाच्या योगाने त्याने आपल्या मिशा उपटल्या, डोकीत धूळ घातली, आणि मो- ख्याने उर बडवून ओरडू लागला, शेवटी मूर्छा ये. ऊन पडला. अशी त्याची चळ भरल्या सारखी अवस्था होऊन त्याखोलीतून बाहेर वेड्यासारखा भटकत गेला. माध०- पण, दादा, अशी त्याची अवस्था पाहून ज्यांनी त्यापासून द्रव्य जिंकून घेतले होते त्यांनी त्यास पुन: परत दिले नाहीं ९ मी तर, ब्वा, तसे केले असते. जय.- अरे, द्रव्य परत कस्चें! त्यांनी त्याला मा- घारे देखील आणले नाही, एकदा मात्र खेळावरू- न दृष्ट काढून त्याजकडे तिरस्काराने पाहिले. राधा- अरे, अरे, ते कसे निर्दय प्राणी होते ।