पान:बाळमित्र भाग २.pdf/३०३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान जुगारी २९९ जय०- पण अझून सगळ्यापेक्षां वाईट गोष्ट ती सां- गावयाची तशीच राहिली आहे - त्याच रात्रीस त्याबापड्याने प्राण सोडिला. राधा- अरेरे काय मोठा अनर्थ झाला हा! माध०- छी छी, हे कर्म फार वाईट, दादा, मी तु- झांस वचन देतों की आजपासून कद्धी गंजीफा खेळावयाचा नाही, हाच मी गोविंदाकडे जाऊन सांगतो. जय- अरे, थांब, थांब, इतकी उतावळी करूंनको, एखादे चांगले कर्म वाईट रीतीने केल्यामुळे नाश झाला ह्मणून ते कर्म अगदीच सोडावे की काय ९ मी तुला काय सांगितले की मित्र एकच असल्या- वर खेळण्यांत मुख. मग त्यांत कांही नाश नाहीं, हितच आहे. राधा-हित आहे, दादा ? जय०- हित हेंच की तो खेळ आपणास अनुकूळ किंवा प्रतिकूळ जरी आहे तरी सहन करावें; आ. ही इतकेंच शिकतों, जिंकल्याचा हर्ष किंवा हर- ल्याचा खेद किमपि मनांत आणूनये. माध.- मी काही इतका निचाडा नाही की दुस- न्यास जिंकलें असतां त्याचा धिक्कार करीन आ. णि हरलों असतां आपला खेद लोकांत प्रगट क- रीन, पण वाईट गोष्ट परिछिन्न नघडावी ह्मणून गोविंदाकडे जाऊच नये हे बरें.