पान:बाळमित्र भाग २.pdf/३०४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. जय०- ह्यांत कांही मोठीशी गोष्ट आहे असे नाही, तुला इकडे खेळणें नाहीं हाणून तूं असें ह्मणतोस, तिकडे जरी गेलास तरी खेळावयाचे तुझ्या हाती आहे. माध०- मला पकें गऊक आहे, मी गेलों ह्मणजे ते मला खेळावयास खचीत बसवितील. जय०- बरें कांही चिंता नाही, त्यांशी खेळलास तर तुझी आणखी दाट ओळख पडेल, पण गोविंदाचे घरी तूं जाऊंनको, त्यासच इकडे बोलावून आण, आणि सांग की राधाही खेळावयास इच्छिते आहे. राधा- पण दादा- जय- अगे, उगीच राहा, त्यांत कांहीं कारण आहे. राधा- खरे, पण त्यांनी माझे पैसे जिंकून घेतले तर मग म्यां काय करावें? जय०- ते मी परतून देईन. माधवा, त्यांस सांग की माझा एक मित्र आहे त्यास मी खेळावयास आणीन. माथ- दादा, पण माझा कोणी मित्र येणारा नाही. . मग असेंकसे सांगू जय०- अरे, माझा मित्र झटल्यावर तुझे ध्यानांत येत नाही राधा- दादाचे बोलण्याचा भाव त्यांजकडेसच आहे, हैं तुला समजत नाही काय ? माध०- होय दादा, तुझी खेळत असला तर ते अग. त्य येतील,