पान:बाळमित्र भाग २.pdf/३०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान जुगारी. ३०१ जय-मित्र कोण हे त्यांस कळवू नको, आतां मी अर्जी लिहावयास जातो; परतून येईन तंवर तूं त्यांशी खेळत ऐस बरें ९ प्रवेश ७ राधा आणि जयराम. जधा- तुह्मी येथेच असा दादा, जाऊ नका, हे मला बरे दिसतें. जय०- कांबरें राधा-शिवरामाच्या बोलण्यावरून मला अंदेशा आ- ला आहे की, माधवाचे पैसे लबाडीने जिंकून घ्यावे असा त्यांनी कट केला आहे. जय.- असें आहे ? तर मी येथेंच लपून राहतो, तूं मात्र खबरदार हो, ते ठकबाजी करूं लागले तर कांहीं बोलूं नको. राधा- ते जर माझ्या भावाचे पैसे बुचाडूं लागले तर माझ्याने उगीच कसे राहवेलन जय- अशाने त्यांची खोडच मोडेल, पुन्हां गंजिफा खेळण्याचा नाद व नीचाची संगत धरण्याचा नाद अगदी मोडून जाईल. राधा- आपला माधव तर अगदीच भोळा, ब्वा, त्या- चे गांवीं कांही नाही. त्याचा स्वभाव न्यास अझुन