पान:बाळमित्र भाग २.pdf/३०६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०२ बाळमित्र. कळत नाही. त्यास असे समजेना की हा झणजे आपणास ठकवितो, आणि हरूं लागला ह्मणजे जो तापतो तो अगदी तांबडा लाल होतो, त्यास भान देखील राहात नाही. जय०- पण दाराकडे कोण आला तो ९ गोविंदा आ- पले मित्रांस घेऊन आला असे वाटते, आतां मी एकीकडे लपून राहतो. प्रवेश ८ गोविंदा, माधव, राधा, दाजी, आणि तात्या. गोविं०- ( राधेला ह्मणतो.) माझे मनास प्रशस्त वा- टत नाहीं, कां की आह्मी इकडे आलो ह्मणून क- दाचित तुह्मांस उपद्रव लागेल. माघ- तिला कांही आपला उपद्रव नाही, तीही आपल्या बरोबर खेळावयास येणार आहे असे माझे होन्यांत येते. राधा- होय, तुह्मी खेळू द्याल तर मी तुह्मांबरोबर खेळेन. दाजी०- ( मनांत वाईट आणून ह्मणतो.) बरेंच झा- लें तुह्मी आला, तर मला फार आनंद आहे. तात्या- (गोविदास हळूच ह्मणतो.) हे फार वा- ईट झाले, आतां ती जसें ह्मणेल तसे खेळणे प्राप्त आहे, आपण इकडे येऊन पस्ताई पडलों.