पान:बाळमित्र भाग २.pdf/३०७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान जुगारी. माध०- अहो गड्यांनो, माझा एक मित्र आहे त्यास मी खेळावयास आणीन, त्याचे जवळ पुष्कळ ट्र- व्य आहे. गोवि०- ठीक आहे. राधा- तुमची मर्जी असल्यास आपण येथे बागांतच खेळू. माझा बाप आतां इकडे यावयाचा नाही, तुह्मांस इकडे खेळं देण्याविषयी त्याने मला आज्ञा दिली आहे. (हे ऐकून विठू वगैरे सर्व मुले आ- नंद पावतात.) माधवा, चल आपण कांहीं भातु- कली आणि गंजिफा घेऊन येऊ. तात्या- कशाला जातां बाई, ह्या मजजवळ गंजिफा आहेत. माध०- काय तूं आपल्या खिशांतच नेहमी गंजिफा बाळगतोस १ तात्या- होय, मी आतांशी रात्रंदिवस गंजिफांचा अ./ भ्यास करीत असतो ह्मणून. राधा-- तुमच्या जवळ कवड्या आहेत ? सात्या- आह्मी पैसे लावितों. गोविं०- (तात्यास एकीकडे करून ह्मणतो.) मजजवळ पैसे नाहीत हे तुला माहीत नाही काय ९ (मोठ्या- ने) कवड्या नसल्या तर मोजावयास फारवेळ लागेल, ह्यासाठी बाई तुझी कृपाकरून जर कवड्या आणाल तर फार बरे होईल,