पान:बाळमित्र भाग २.pdf/३०८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. राधा-बरें तर माधवा, चल आपण कवड्या आणा- वयास जाऊं. प्रवेश ९ गोविंदा, तात्या, दाजी, आणि विठू.. दाजी०- आह्मी येथे आलों ही फार वाईट गोष्ट झा- ली. नीट झाले नाही. विठू- त्याचा बाप येथें नाहीं मग काय चिंता आहे ? तात्या- (गोविंदास ) तूं अगोदर इकडे यावयास का राजी झालास १ गोवि.- येथल्याला आणि माझे घरच्याला काय अंतर आहे ? विठू- माधवाने सर्व आपला माल हरविल्यावर आ. पल्या मर्जीस येईल तेथे आपण जाऊन खेळं. दाजी- राधाबाईचे द्रव्य आही सर्व जिंकून घेऊ असें वाटते. तात्या- ह्यांत काय संशय आहे ? पण, गड्या, आपण पहिल्याने जपून खेळले पाहिजे; अगोदर एक डा- वाचा पण लावावा, तो त्यांसच जिंकू द्यावा, ह्मणजे त्यांस अंमळ लोभ उत्पन्न होईल, मग आपण दु. प्पट पण करूं. गोवि०- बरे आहे, हे तूं आपलें वचन मात्र विसरूं नको हो, तात्या.