पान:बाळमित्र भाग २.pdf/८९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८१ दुखणाईत सरदार. जग०- मला पागे बरोबर मोहिमेवर जाण्याची तर आज्ञा नाहींच, आणि चाकरी नकरितां घरी राहा- वें असेंही नाही. पण काही दुसरेंच आहे. मुले- ते काय बाबा ९ जग०- मी दुखणाईत आहे ह्मणून राजास कोणी सुचविले, नकळे. परंतु राजाने माझी रीत रवेस पाहून किल्याची देख रेख मात्र करावी अशी कि- ल्लेदारीची सनद मला दिली आहे. गण - बाबा, तर आतां तमी किल्लेदार झालां काय ? यमु०- बाबा, आतां तमी सर्वांपेक्षा मोठे झालां ना ? जग- ज्या थोरांनी मजवर येवढा उपकार केला, की जो सांगतां परे होत नाही, त्यांचेच द्वारा मला ही पदवी मिळाली असे वाटते. मुले- आतां आह्मी चोहीकडे धावून त्यांस पाहून घेऊन येतो. प्रवेश ७ शिवाजी, जगदीशराव, गणपतराव, हिराबाई, आणि यमुना. (शिवाजी झाडांतून बाहेर निघतो. व जगदीशरावा. कडे जातो) जग- ( रामराम करून शिवाजीस भेटतो, आणि हाती धरून गालीच्यावर बसवितो.) आपण परो- पकाराकडे शरीर वेंचितां; आपला उपकार म्यां