पान:बाळमित्र भाग २.pdf/९०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. जन्मपर्यंत आपली सेवा केली तरी फिटणार नाही. हिरा०- आह्मी सर्व तुमची उपकारी झालों हे किती सांगावें ? तुमच्या पत्राने जो आह्मांस आनंद झा. ला तो तोंडाने सांगवत नाही. तुह्मीं आतां नवा बाबा आमांस दिला असें झालें. शिवा- मी काय, आपला राजाच असा रूपावंत ! तुमचे नांवाचा एक कागद कचेरीत आला, तेव्हां माझे मनांत आले की, हे विनंतीपत्र तुमचे कुटुंबा. कडून आले असेल. असा निश्चय करून, तुमची शरीर प्रकृति अशक्त, तुह्मांस चाकरीवर दूर पाठविणे हे नीट नव्हे, असें मनांत आणून राजा जवळ रजेची गोष्ट काढिली. आणखी माझे मनांत आले की, रजेपेक्षा दुसरे कांहीं काम मिळवावें; ते. व्हां विनंती करून किल्लेदारीची जागा तुझांसाठी मागून घेतली; आणि तुझांस हे वर्तमान कळवाव- याकरितां मी पुढे निघून आलो. आतां तुमची भेट झाली, फार आनंद झाला, जग- मला हे कांहींच माहीत नाही; पण आपण तिचे पत्रास रुकार दिला ही केवढी गोष्ट! हे केव- ळ सामान्य पुरुषाचे करणे नव्हे, आपण तसेच योग्य आहां, केवढा मजवर उपकार केला हा ! हिरा०- मी तुमची मुदी घेतली, पण मला लाज वा- टते, ही फार मोलाची आहे.