पान:बाळमित्र भाग २.pdf/९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुखणाईत सरदार. ८३ शिवा० - चांगली खरी, त्यांत तुझे बोटांत आहे म- णून तिची किमत फारच वाढली; आणि आतां ही माझी आहे असे मला वाटत देखील नाही. यमु०- तुमी मलाही असेंच उत्तर द्याल ह्मणून मी बोलत नाही. गण- रावसाहेब, बखर ह्मणून मला हा कामाचा कागद दिला, त्यास हा आपला माघारा घ्या. शिवा०- मुला, जाणून पसूनच हा कागद मी तुला दिला. आतां तुझा बाप जर तुला मजजवळ देईल तर मी तुला शिलेदार करून घेऊन जाईन. जग०- आमचे हित आपण कराल ते थोडेच आहे, ईश्वराने आह्मांवर कृपा करून आपलें येणें इकडे पर घडविलें. गण- खरेच मला शिलेदार करितां ? वाहवा! तर बरें आहे. शिवा- होय गड्या. "गण - मी आतां तुह्मां बरोबर फौजेत येतों, लोकांस बाबाचे नांवाचा विसर पडू देणार नाही. जग०- आपण जशी इतकी कृपा केली तशी आतां येवढी एक विनंती सेवकाची ऐकिली पाहिजे. शिवा- तुमचा अभिप्राय माझे लक्षात आला. माझे ही मनांत अगोदरच आले आहे की, आजचा दि- वस तुमचे येथे राहून तुमची मेजवानी घ्यावी; परंतु तुमचे यमुनाबाईचे मनास येईल तेव्हां.