पान:बाळमित्र भाग २.pdf/९२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. यमु०- आमचा बाबा राहिला, आतां तुमची मर्जी असेल तंवर तुझी आमचे येथे राहावें. हिरा०- आतां आणीक दुसरे आंबे घ्या, यमु०- हे आंबे मघां तुमचे येण्याने फार कडू वाटत होते, पण आतां फारच गोड लागतात. बापू आणि गंगा. रामराव ह्मणून कोणी एक गृहस्थ व त्याची बा- यको पार्वतीबाई ह्या उभयतांनी एक पोरका मुलगा त्याच्या लहानपणापासून बाळगला होता, त्याचे नांव बापू त्यांनी त्याचे लालन पोषण असे केले, की को- णाचे मनांत हा बाळगलेला मुलगा असे वाटू नये, केवळ ह्यांचेच पोटचा असें. वाटावे. त्या उभयतां स्त्री- पुरुषांस एक मुलगी मात्र होती, दुसरे अपत्य कांहीं नव्हते; त्या मुलीचें नांव गंगा, ती बापूच्या बरोबरीची होती, त्या उभयतां मुलांची परस्पर प्रीति इतर मुलां- पेक्षां विशेष असे. ज्येष्टमासी एकेदिवशी सुप्रभाती बापू आणि गंगा आपली मैत्रीण भागीरथी हीस बरोबर घेऊन बागांत खेळावया करितां गेली. गंगा व भागीरथी ह्या दोघी मुली आठ वर्षांचे आंत होत्या, त्या बागामध्ये फारवेळ खेळून आनंद पावल्या. एकीमेकीचा हात धरून गाणे