पान:बाळमित्र भाग २.pdf/९३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बापू आणि गंगा.. गात गात झाडांखालून फिरताहेत, तंव त्या दोघीज- णींची दृष्टि आंब्याचे झाडावर पाड होते त्यांकडे गेली; त्या झाडावरचे पाड अगोदरच कोणी बहुत करून ने- ले होते, कोठे दहापांच वर राहिले होते, ते असे पिव. ळे धमधमीत होते की. पाहतांच तोंडास पाणी सुगवें, आणि कोणी ह्मणेल की, पाहणारास तोडून न्यावया- साठी बोलाविताहेत, अशा त्या पाडांकडे त्यांचे मन वे. धले. बापू पुढे धावत जाऊन त्या झाडावर चढला, आणि त्याचे हातास जितके पाड आले तितके तोडून खाली दोघी मुली साडीचा पदर पसरून उभ्या होत्या त्यांजकडे यकिले. तेव्हां अशी कांहीं मौज झाली की, त्यांतून अल- गलेले चांगले चांगले पाड तेवढे भागीरथीचे ऑीत पडले, तेणेकरून ती फार हर्षित झाली आणि तिची कांहीं दृष्टि फिरली; परंत बापूनें जर दाटून तसे केले असते तर तिची दृष्टि फिरली हे नीटच होते, कांकी गांवांतील सर्व मुलांपेक्षां बापू फार सुंदर व गुणी होता, पण तसे काही झाले नाही. मग ते चांगले पाड भा- गीरथी गंगास दाखवून ह्मणते, जाऊदे तुझे पाड घाणे- रडे, हे पहा माझे कसे चांगले आहेत ते! तेवेळेस गंगास फार वाईट वाटले, आणि खिन्न होऊन तिने तोंड खाली घातले; मग खेळणे संपे तोपर्यंत गंगाने मुखांतून एक चकार शब्द देखील काढला नाही.