पान:बाळमित्र भाग २.pdf/९४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. मग घराजवळ गेल्यावर भागीरथी गंगास विचारून आपल्या घरी गेली. घरांत जाण्याचे अगोदर बापूने गंगास विचारिलें की. ताई. तं अशी रुष्ट कांगे दिसतेस ? तुझा मजवर राग नसावा, भागीरथीस आंब्यांचा वाटा मिळाला ह्मणून तुझ्या मनांत वाईट वाटूनये, कांकी, तूं पुरते जाणतेस की, मी तुजवर अधिक प्रीति करितों, आणि त्या प्रीतीचे प्रमाण दाखवावयासाठी मी झाडावरू: न चांगले चांगले पाड तझ्याकडे टाकले; पण कसे झाले नकळे, सर्व चांगले पाड भागीरथीचे पदरांत पडले; त्याला माझा काही उपाय आहे ? बरें, ते पाड तिच्या पदरातून निलाजऱ्यासारिखे मला घेता येतात हे तूंच सांग बरे कसें ते. परंतु त्वां कांहीं येवढ्याश्या गोष्टी- वरून नेणत्या पोराप्रमाणे रागें भरूनये, आणि मजवि. षयी तुला कधी राग यावयाचा नाही हे मला पके ठाऊक आहे. तुजविषयी मी किती जीव देतो ह्याची खातरी एखादे वेळेस अवकाश सांपडेल तेव्हां करीन. मी झाडावर असतांना तुला राग आणावा असे माझे मनांत नव्हते. गंगा ह्मणाली काय मला राग आला । हे तुला कोणी सांगितलें : भागीरथीचे पाड किती का बापडे चांगले असेतना, मला काय करावयाचे आहेत. आधाश्यासारखें माझें चित्त कांहीं खाण्यावर नाही, हे तूं जाणतोसच; त्यामुळे मला राग आला असें नाही पण तिने आपले पाड दाखवून मला हिणावले, ते मला सोसले नाही. ह्यासा माझी समजी व्हावी असें जर