पान:बाळमित्र भाग २.pdf/९५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बापू आणि गंगा. तुझ्या मनांत आहे तर तूं माझे पायां पडून क्षमा मा. गून घे, नाही तर मी तुशी कद्धींच बोलणार नाही. बापू ताठ्याने बोलतो, पायां पडावें ! ही गोष्ट मी कदाकाळी करणार नाही. मजकडून जर काही अपराध झाला असता तर मग असो. परंतु अपराधा- वांचून पायां पडले असतां अपराध कबूल केला असें होईल. पण तुला मी एक गोष्ट खचीत सांगतो, मी काही लबाड कृत्रिमी नव्हें. तला रागे भरवावे हे माझ्या मनांत देखील नाही. ह्या उपर हे तुला खरें जर न भासलें तर मग तं हा अन्याय करितेस. मग नी हणाली, बरेंच किरे बोलतोस; तूं माझें ऐकत ना- हीस, आणि अनादर करितोस: ह्याचे कारण मला स्प- ट कळून येते की, तुझी भागीरथीवरच फार प्रीति आ. हे, आणि ह्मणून तीही असे बोलली. ह्याप्रमाणे बो. लून बापूकडे नपाहतां धिक्काराने मान हालवून रागें रागे घरांत गेली. 1 इतक्यांत भोजनाचे सिद्ध झाले तेव्हां उभयतां भावंडे एका पंगतीस बसून भोजन करूं लागली; पण जेवतेवेळेस एकमेकांकडे फारच क्रोध दृष्टीने पाहत अ. सत. पाण्याचा तांब्या बापूचे आंगें होता ह्मणून गंगा पाणी देखील जेवण होईपर्यंत प्याली नाही. ही ति. ची चर्या बापूने ओळखून त्यानेही तिजकडेस पाहिले. नाही. नत्रापि मधून मधून चोर दृष्टीने गंगा बापूकडे व बापू गंगाकडे पहात असत. एक वेळ उभयतांची