पान:बाळमित्र भाग २.pdf/९६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८८ बाळमित्र. एक दृष्ट झाली, तेव्हां गंगा तन्क्षणीच एकीकडे पाहूं लागली, हे बापूनें पाहतांच आपल्या मनांतून गंगा फारच उतरली असा भाव दाखविला. मग जेवण झा• ल्यावर आईनें गंगास कांही विचारले, तेव्हां गंगाने चापूचे रागामुळे आईशी कांहीं धड उत्तर केले नाही, झणून आईस राग येऊन तिने गंगास बाहेर घालविले. तेव्हां ती रडकुंडे तोंड करून रागाचे भिरीरीने खोली. तून निघून बागाचा दरवाजा उघडा होता तिकडे गेली. मग उदास होऊन बागाचे बंगल्यांत एक लहान खो. ली होती तेथे जाऊन आणखी पुष्कळ रडली. मग तिचे मनांत आले की, मी व्यर्थ बापूशी कज्जा केला. अशी ती फार पस्ताई. पडली. कांकी ती कधाहा रडू लागली असतां बापू तिचे समाधान अगोदर करीत असे. जेवावयाचे खोलीत बापू होता. तो गंगा आईस रा- ग आणून बाहेर गेली हे पाहन मनांत फार खंत क. रूं लागला. आईनें व बापाने त्यास उत्तम आंबे दिले होते ते बहिणीस द्यावयाचा मनसोबा करून ते आंबे खिशांत लपवावयाचा यत्न करूं लागला; त्याचे मनांत की, एकदा कसेही करून कोणत्या तरी निमित्ताने बागांत जाऊन तिला आंबे द्यावे. पण तो मनसोबा आईबापांस कळूनये ह्मणून काही युति योजू लागला. न्याने ते आंबे घेऊन उगीच धुतले, खाली ठेवले, पु. न्हां हातांत घेतले, असें दहापांच वेळ केले. तेथें ज-