पान:बाळमित्र भाग २.pdf/९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९० बाळमित्र. असे व्हावें हें बापूचे मनांत अगोदरच होते, मग काहीं हिरमुसल्या सारखे करून मांजरांचे मागे धरावयासाीं झणून धांवला. धांवतां धांवतां चपळाईने एक आंबा खिशांत व दुसरा पागोट्यांत लपविला, ती मांजरीची पोरेही बागाकडेसच पळाली. हाही धूम ठोकून त्यांचे मागे जाऊ लागला. आई ह्मणाली, बापू, तूं कुठेरे जातोस ? तेव्हां तो उभा राहून उत्तर देतो, मी बागांत फिरावयास जा- तो; मग ती ह्मणाली, कांहीं काम नाही तिकडे जाण्या- चें; अशी अक्षरें तिच्या तोंडांतन निघतांच बापूनें कि. लवाणी तोंड करून झटले, आई, मी तुझ्या पायां पड. तों, मला अंमळ बागांत जाऊंदे; मी काही दांडगाई करणार नाहीं; मग आई बोलली, बरें तर जा. मग बापूचा आनंद किती ह्मणून सांगावा! लाग- लीच धांव मारली, तंव पाय आडखळन पडला, पण दैवयोगाने आंब्यांस किंवा हातपायांस कांहीं धक्का लागला नाही, ह्मणून मग तन्क्षणीच उठून वागांत गेला, आणि सर्व ठिकाणे सोधली, मग बंगल्यांत गेला तों तेथे गंगा त्याचे दृष्टीस पडली. मग पहातो तो अति खि. न होऊन डोळ्यांतून अश्रुपात ढगाळती आहे. तिने बापूस दुखविले व आईही रागें भरली ह्मणून तिची व. त्ति केवळ उदास झाली होती. . बापू तिला नमून बोलला, माझे आई, आतां तु. झी माझी गडी असावी! तूं मजवर रागें भरूं नको;