पान:बुद्ध, धर्म आणि संघ.pdf/१०८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ९८ )
परिशिष्ट २.
पंचस्कंध, अर्हत्पद व निर्वाण .

 पंचस्कंध :- रूप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान या पांच पदार्थानां पंचस्कंध असें म्हणतात.
 पृथ्वी, आप, तेज, आणि वायु या चार महाभूतांला आणि त्यांजपासून उत्पन्न झालेल्या पदार्थांना रूपस्कंध असें ह्मणतात. सुखकारक वेदना, दुःखकारक वेदना, आणि उपेक्षा वेदना या तीन प्रकारच्या वेदनांला वेदनास्कंध म्हणतात.
 घर, झाड, गांव इत्यादि विषयक कल्पनांला संज्ञास्कंध म्हणतात. घर झाड इत्यादि पदार्थ परमार्थतः वर सांगितलेल्या चार महाभू- तांचेच बनलेले आहेत; म्हणून ते परस्परांपासून भिन्न नाहींत. असें असतां संज्ञास्कंधाच्या योगें त्यांचा निराळेपणा आमच्या लक्षांत येतो. ही जी पदार्थांना निरनिराळीं नांवें देण्याची मनाची शक्ति, तिलाच संज्ञास्कंध असें म्हणतात.
 संस्कार ह्मणचे मानसिक संस्कार. याचे कुशल, अकुशल आणि अव्याकृत असे तीन प्रकार आहेत. दुसन्यास मदत करण्याची इच्छा, प्रेम, जागृति इत्यादि संस्कार कुशल जाणावे. लोभ, द्वेष, माया, मत्सर, आळस इत्यादि संस्कार अकुशल जाणावे. अकुशलहि नव्हेत आणि कुशलहि नव्हेत अशा संस्कारांना अव्याकृत ह्मणतात. उदाहरणार्थ, कांहीं पदार्थोंची आवड असणें कांहींची नावड असणे इत्यादि संस्कार पूर्वकर्माचे फलभूत असल्यामुळे अकुशल किंवा कुशल यांत त्यांची गणना होत नाहीं. त्यांना अव्याकृत असेंच ह्यटलें पाहिजे.
 विज्ञान ह्मणजे जाणणे. संक्षेपानं सांगावयाचें म्हटलें ह्मणजे विज्ञानें सहा आहेत. चक्षुर्विज्ञान, श्रोत्रविज्ञान, प्राणविज्ञान, जिव्हाविज्ञान, काय विज्ञान व मनोविज्ञान ह्या सहा विज्ञानांच्या समुदायाला विज्ञा- नस्कंध असें म्हणतात. विज्ञानाला बौद्ध ग्रंथांत चित्त म्हणतात. चित्ताला कधीं कधीं मन हा शब्द लावितात. बौद्धाच्या मतें मन हैं अमूर्त आहे. तें अणु प्रमाण नाहीं. म्हणून तर्कसंग्रहादि न्याय ग्रंथांत