पान:बुद्ध, धर्म आणि संघ.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८ )

होणार आहे ! असे उद्गार काढून ब्रह्मदेव एकदम बुद्धासमोर प्रगट झाला व त्यास ह्मणालाः-
उहि वीर विजित संगाम सत्थवाह अनण विचर लोके । देसेतु भगवा धम्मं अञ्ञातारो भविस्सन्ति ॥ १ ॥
हे वीर, हे सार्थवाह, आतां उठ, तूं संग्राम जिंकिला आहेस, तूं ऋणमुक्त आहेस, सर्वत्र संचार कर. हे भगवन् तूं लोकांस धर्मो- पदेश कर. हा तुझा धर्म जाणणारेहि ( कांहीं ) असतीलच. ह्या ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेस अनुसरून बुद्धानें धर्मोपदेश करण्याचा निश्चय केला.
 आतां हा ब्रह्मदेव कोण, हे येथे दिलेल्या उताऱ्यावरून किंवा महावग्गांतील कथेवरून समजणे अंमळ कठीण आहे. परंतु तेविज्जसुत्त, महागोविंदसुत्त इत्यादि सुत्तांतून जें त्याचें वर्णन सांपडतें, त्यावरून त्याची बरोबर कल्पना करितां येते.
 मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या चार भावनांला ब्रह्मविहार असें ह्मणतात. करणीयमेत्तसुत्तांत हाटलें आहे. माता यथा नियं पुत्तं आयुसा एकपुत्तमनुरक्खे | एवंपि सव्वभूतेसु मानसं भावये अपरिमाणं ॥ ६ ॥
आई जशी एकुलत्या एका पुत्राचें आपले प्राण खर्ची घालूनहि परिपालन करत्ये त्याचप्रमाणें ( त्यानें ) आपले मन सर्व प्राणि- मात्रांविषयीं अपरिमित प्रेमाने भरून ठेवावें.

मेत्तं च सब्बलोकस्मि मानसं भावये अपरिमाणं ।
उद्धं अधो च तिरियंच असंबाधं अवेरं असपत्तं ॥ ३ ॥


 १ मैत्री - सार्वत्रिक प्रेमभाव, करुणा=दया, मुदिता=आनंदीवृत्ति, उपेक्षा=परवा न करणें.