पान:बुद्ध, धर्म आणि संघ.pdf/४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३३ )

कठोर भाषण, असत्य भाषण, सर्व प्रकारची चहाडी, आणि वृथा बडबड, हीं चार वाचिक (पाप) कर्मों होत.

अदत्तानामुपादानं हिंसा चैवाविधानतः । परदारोपसेवा च शारीरं त्रिविधं स्मृतम् ॥

 आदत्तादान (चोरी), वेदविहित नसलेली हिंसा, व परदारा गमन, हीं तीन कायिक पापकमें होत.
मनूनें येथें वेदाला विहित असलेली हिंसा है पाप नव्हे असें मटलें आहे. असा भेद करणें बौद्धांस पसंत होणार नाहीं. हिंसा झटली ह्मणजे ती वेदविहित असो वा नसो, येथून तेथून सर्व सारखी आहे असें बौद्धांचें ह्मणणे. एवढा मतभेद बाजूस ठेवला तर आद्य स्मृतिकारांनी बौद्धमत जसेच्या तसें उचललें आहे असें दिसुन येईल. आजकाल वेदविहित अशी हिंसा फारच क्वचित् घडते. पांचपंचवीस वर्षातून एकादा यज्ञ झाला तर होतो. कालिपूजा, दसरा इत्यादि प्रसंगी होणाऱ्या बलिदा- नास वेदविहित असें ह्मणतां येणार नाहीं. तेव्हां वरील दहा पापांचा पूर्णपर्णे त्याग करण्याचा एकाद्या कर्मठ हिंदुगृहस्थानें निश्चय केला असतां स्मृतिग्रंथ त्याच्या आड येणार नाहींत, इतकेंच नव्हे तर वर दिलेल्या मनुस्मृतींतील उताऱ्याचा त्याला बळकट पाठिंबा मिळेल.

 आयुर्वेदालाहि ह्या दहा पापांचा त्याग मान्य आहे अष्टांगहृदय संहितेच्या २ ऱ्या अध्यायांत वाग्भट ह्मणतात:-

सुखं च विना धर्मात्तस्माद्धर्मपरो भवेत् । भक्त्या कल्याणमित्राणि सेवेतेतरदूरगः ॥

१ मनुस्मृति इ० स० च्या चवथ्या शतकांत लिहिली असावी असें आलिकडील पंडितांनी ठरविलें आहे. डा० भांडारकरांचा A Peep into the Early History of India, (Page 46 ) हा निबंध पहावा.


 १ मनुस्मृति इ० स० च्या चवथ्या शतकांत लिहिली असावी असें आलिकडील पंडितांनी ठरविलें आहे. डा० भांडारकरांचा A Peep into the Early History of India, (Page 46 ) हा निबंध पहावा.