पान:बुद्ध, धर्म आणि संघ.pdf/५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४२ )

 या श्लोकांत क्रमाक्रमानें प्रेमभाव कसा वाढवावा, हे सांगि- तलें आहे. प्रथमतः स्वतःवरच प्रेम उत्पन्न करून तें आपल्या मित्रांवर, मध्यस्थांवर व तदनंतर आपल्या शत्रूंवरहि उत्पन्न केलें पाहिजे. तसेंच तें पहिल्यानें आपल्या गांवच्या प्राण्यावर उत्पन्न करून हळू हळू त्याची मर्यादा विश्वमर्यादेपर्यंत नेऊन पोचविली पाहिजे. सगळा प्राणिसमुदाय आपल्या डोळ्यांसमोर उभा आहे कीं काय अशी कल्पना करून त्यांजवर मी मनोभावें प्रेम करीत आहें, माझें अंतःकरण प्रेममय झालें आहे, मला शत्रु ह्मणून कोणीच राहिला नाहीं, व्याघ्र, सिंह इत्यादि हिंस्र प्राणी देखील माझे मित्र झाले आहेत. सर्प माझ्या अंगावर लोळत आहेत, हा वाघ या बाजूला माझ्या मांडीवर डोके ठेवून स्वस्थ झोंपी गेला आहे, कोणापासूनच मला भय ह्मणून राहिलें नाहीं, अशी भावना केली पाहिजे.

 एकाद्याच्या अंतःकरणामध्यें द्वेषभाव तीव्र असल्यामुळे त्याच्या शत्रूची त्याला वारंवार अठवण होते; आणि

तिच्या योगें मैत्री भावनेस जबरदस्त अडथळा येतो. अशा मनुष्यानें बुद्धोपदेशाचें आणि साधुसंतांच्या उपदेशाचें पारायण करून आपल्या मनांतील वैरभाव दूर दवडण्याचा प्रयत्न करावा. या संबंध ककचूपमसुत्तांत भगवान् बुद्धानें भिक्षूंस केलेला उपदेश ध्यानांत ठेवण्यासारखा आहे.

 बुद्ध ह्मणाले: - भिक्षू हो, प्राचीनकाळीं ह्या श्रावस्ति नग- रीतच एक वैदेहिका नांवाची कुलीन स्त्री राहत होती. ती गोड बोलणारी आहे, नम्र आहे व ती फार शांत आहे, अशी तिची सर्व शहरांत ख्याति होती. भिक्षू हो, त्या वैदेहिकेची एक परम दक्ष आणि उद्योगी काली नांवाची दासी होती. एके दिवशीं त्या दासीच्या मनांत अशी शंका आली कीं, ही माझी