पान:बुद्ध, धर्म आणि संघ.pdf/९६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ८६ )

प्रदेशांत राहणाऱ्या रेवत भिक्षूला आपल्या पक्षाचा पुढारी कर- ण्याचा विचार केला. हें वर्तमान रेवतास समजलें, तेव्हां त्यानें आपले स्थान सोडून दुसरीकडे प्रयाण केलें; कारण त्याला पुढा- रीपणा नको होता. त्याच्या मागोमाग ते भिक्षू त्या ठिकाण गेले. अशा रीतीनें चार पांच ठिकाणीं फिरून त्यांनीं त्यास गांठलें, व आपला पुढारीपणा त्याला दिला. हें वर्तमान वज्जिपु- तक भिक्षूला समजलें तेव्हां त्यांनीं उत्तर भिक्षूच्या मार्फत रेवताचें मन आपल्या पक्षाकडे वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो सिद्धीस गेला नाहीं.
 नंतर हे सर्व भिक्षू जेथें हा वाद उपस्थित झाला, तेथेंच तो मिटवावा या उद्देशाने वैशालीस आले. वैशाली नगरीत सर्व- कामी नांवाचा एक अतिवृद्ध भिक्षु रहात होता. आनंदाचा ( ज्याला महाकाश्यपानें धर्मसंबंधीं प्रश्न विचारले त्याचा ) हा सोबती. ह्याचीहि वाद मिटविण्याच्या कामी त्या भिक्षूंनीं मदत घेतली. ते सर्व भिक्षु एकत्र जमले. परंतु एका पक्षानें एक ह्मणावें, तर दुसऱ्यानें दुसरें, अशी स्थिति झाली. वाद कांहीं मिटेना. तेव्हां त्यांनीं प्रत्येक पक्षाचे चार चार भिक्षु निवडले, व त्यांनी बहुमतानें वाद मिटवावा, असें ठरविलें. वज्जिपुत्त- कांच्या तर्फे, सर्वकामी, साळ्ह, खुजसोभित आणि वास- भगामिक या चारांची निवड झाली. पावांतील वगैरे भिक्षूंच्या तर्फे, रेवत, संभूत, यश आणि सुमन या चारांची निवड झाली. ह्या आठांनीं वालिकाराम विहारांत एकत्र होऊन वादाचा निकाल यशाच्या तर्फे केला. याप्रमाणें दुसऱ्या संगी- तीचें काम संपलें.
 पहिल्या आणि दुसऱ्या संगीतीची हकिगत त्रिपिटकांतील चुल्लवग्गांत आली आहे. तिसऱ्या संगीतीची हकिगत त्रिप-