बृहद्योगवासिष्ठसार. आपल्याकडे आलो आहे. तरी कृपा करून त्या माझ्या सशयाचे निर- सन करा. मोक्षाचे साधन केवल श्रौतस्माते-कर्म आहे; की केवल ज्ञान आहे, की ज्ञान व कर्म ही दोन्ही मोक्ष-साधने आहेत ? ( वेदाने सागि- तलेल्या अग्निहोत्रादि कर्मास श्रौत कर्म, व स्मृतीनी सागितलेल्या पच महायज्ञादिकमास स्माते कर्म ह्मणतात. आणि ज्ञान ह्मणजे आत्म्याचा साक्षात्कार.) सुतीक्ष्णाचा हा प्रश्न ऐकून अगस्त्य ह्मणाले-बा प्रिय सुतीक्ष्णा, दोन्ही पखाच्या सहायाने जशी पक्ष्याची अतरिक्षात गति होते. त्याप्रमाणे ज्ञान व कर्म या दोन उपायाच्या योगाने प्राण्यास परम पद प्राप्त होते. ज्ञानावाचून केवल कर्म व कर्मावाचून केवल ज्ञान मोक्षाच्या उपयोगी पडत नाही. किवा कर्म ज्ञानाचे साधन आहे व ज्ञान मोक्षाचे साधन आहे. ह्मणजेच ज्ञान हे मोक्षाचे साक्षात्कारण आहे व कर्म ज्ञानाच्या द्वारा ह्मणजे परपरेने मोक्षास कारण होते. वर पखाचा जो दृष्टात दिला आहे तो-पक्ष्याच्या गतीस जशी दोन्ही पखाची गरज असते त्याप्रमाणे मोक्षास कर्म व ज्ञान या दोधाचीही गरज आहे- एवढे सुच- विण्यापुर्ताच आहे. कारण पक्ष्यास उडताना दोन्ही पंख एकदम हालवावे लागतात. पण साधकास कम व ज्ञान याचा एकाच वेळी उपयोग करिता येत नाही. कारण कर्म ज्ञानाचे साधन आहे व साधनाच्या अनुष्टाना- नंतर साध्याची सिद्धि होत असते. असो, याविषयी मी तुला एक पूर्व इतिहास सागतो. पूर्वी कारुण्य या नावाचा कोणी एक ब्राह्मणपुत्र होता. त्याच्या बापाचे नाव अग्निवेश्य असे होते. त्याने सर्व वेदाचे व शास्त्राचे सागोपाग अध्ययन केले व गुरूच्या आज्ञेने तो आपल्या घरी परत आला. पण तो आपल्या घरी आल्यावर शास्त्रविहित कर्मे न करिता बावरल्या- सारिखा होऊन राहूं लागला. तेव्हा आपला पुत्र कर्माचा त्याग करून राहण्याची इच्छा करीत आहे, असे पाहून अग्निवेश्य त्यास हितबुद्धीने ह्मणाला-बाळा, तू स्वकर्माचे अनुष्ठान का करीत नाहीस ' स्वकर्म- त्यागाने तुला सिद्धि कशी प्राप्त होईल ? याप्रमाणे कर्मापासून निवृत्त होण्यास तुला काय कारण झाले, ते मला साग. आपल्या पित्याचा, अगदी कळकळीने केलेला, हा प्रश्न ऐकून कारुण्य ह्मणाला-जीवात जीव असे तो अग्निहोत्र ठेवावें, सध्योपासना नित्य करावी, इत्यादि श्रुति ( वेद ) व स्मृति यानी सागितलेला हा प्रवृत्तिरूप धर्म आहे.
पान:बृहद्योगवासिष्ठसार भाग १ ला (Bruhdyogavasishthsar Part 1).djvu/१०
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही