३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग १. इत्यादि दृश्य अविद्येमुळे जोवर असते तोपर्यंत त्यास व्यक्त करिते व अविद्येच्या नाशामुळे त्याचा नाश झाला म्हणजे केवल अवस्थेत रहाते. श्रीराम-गुरुराज, पण हे दृश्य असत् आहे, असे आम्हांस वाटत नाहीं आणि ते सत् असल्यास त्याचा बाध होणे कधीही शक्य नाही. तेव्हा याचा नाश कसा होणार? श्रीवसिष्ठ-या दृश्य पिशाच्याचा नाश कसा होईल, त मी तुला सागतो. आता मी जो हा मंत्र तुला सागत आहे त्याच्या यो- गाने ते नाहीसे होईल. येथे जरा विचार केला पाहिजे. आम्ही वैदिक विवर्तवादी आहो. म्हणजे जग मिथ्या आहे, रज्जूचे ठायी जसा सर्पाचा भ्रम होतो त्याप्रमाणे अविद्यायुक्त चैतन्याच्या ठायीं जगाचा भ्रम झाला आहे. त्यामुळे ही दोरी आहे, असे समजले की सर्पभ्रम जसा बाधित होतो त्याप्रमाणे चैतन्याचा साक्षात्कार झाला की, जग बाधित होते; असा आमचा सिद्धात आहे. म्हणूनच "जग मिथ्या आहे, अशी भावना करा." असे आम्ही आमच्या शिष्यवर्गास प्रथम सागतो. कारण तें मिथ्या आहे, असे समजल्यावाचून त्यातील पदार्थांविषयी असलेली आसक्ति कमी होत नाही. ती असे पर्यंत वैराग्य, विवेक व शमादि साधने यास संपादन करिता येत नाही. त्याच्या अभावी ब्रह्मविचाराची योग्यता अथवा अधिकार येत नाहीं; व त्यामुळे ज्ञान व ज्ञानप्राप्य मोक्ष ( केवळभाव ) ही दुर्लभ होतात. पण या वैदिक तत्त्वाचा अनादर करून अवैदिक परिणाम- वादाचा अगीकार केल्यास कशी अडचण येते ती पहा-परि- णाम-वादात वस्तूच्या उत्तरोत्तर अवस्थाच्या योगाने तिच्या पूर्व अवस्थाचा केवळ लय होतो, अत्यत उच्छेद ( नाश ) होत नाही. कारण ती वस्तु सत् असते व सत्चा अभाव होणे न्यायविरुद्ध आहे. उदाहरणार्थ-दूध ही वस्तु घेऊ या. तिचे दही झाल की पूर्व अवस्था नाहीशी होते, हे खरे, पण त्यामुळे त्या वस्तूचा अत्यत नाश होत नाही. दह्यापासून लोणी व ताक, लोण्यापासून तूप इत्यादि उत्तरोत्तर अवस्थेतही दूधाचा अत्यत नाश होत नाही. त्याचप्रमाणे जग हा चैतन्याचा परिणाम आहे, असे समजल्यास, नाश या सहाव्या भावविकाराच्या योगानें गुत झालेले द्वैत चित्तात किंवा प्रकृतीत काम, कर्म व वासना या रूपाने
पान:बृहद्योगवासिष्ठसार भाग १ ला (Bruhdyogavasishthsar Part 1).djvu/११९
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही