पान:बृहद्योगवासिष्ठसार भाग १ ला (Bruhdyogavasishthsar Part 1).djvu/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बृहद्योगवासिष्ठसार.

करावेसे वाटेल ते मी करीन. ही त्याची विनति मान्य करून मी ह्मटलें- स्वर्गीत पुण्यसामग्रच्या योगाने सुख होते. जो उत्तम पुण्यवान् असतो त्यास उत्तम सुख मिळते; तसाच मध्यम पुण्यवानास मध्यम व कनिष्ठ पुण्याच्या योगाने कनिष्ठ प्रतीचा स्वर्ग मिळतो. तेथे दुसऱ्याचा उत्कर्ष सहन होत नाही. बरोबरीच्या सुखी प्राण्याशी मोठी स्पर्धा करावी लागते व आपल्यापेक्षां कमी सुखी प्राण्यास पाहून मोठा सतोष वाटतो. साराश सुखोपभोगाने पुण्य क्षीण होईतो हे असे चाललेले असते, आणि पु- ण्याश सपला की तो प्राणी पुनः या मर्त्यलोकात येतो. माझे हे भाषण ऐकून तो पूर्ण विरक्त राजा ह्मणाला- दूता, मला असल्या स्वर्गाच मुळीच इच्छा नाही. मी याहीपेक्षा उग्र तप करून सापाच्या कातेप्रमाणे या अशुद्ध शरीराचा त्याग करीन. तू हे विमान घेऊन परत जा. तुला नमस्कार असो. देवदूत-अप्सरे, हे त्याचे' निग्रहाचे भाषण ऐकून मी इद्राकडे परत गेलो व राजाचा हा वृत्तात स्वामीस सागितला. तो ऐकून न्यालाही मोठे आश्चर्य वाटले, व तो पुनः मधुर शब्दानी मला ह्मणाला- दृता त्या विरक्त राजास आत्मबोधाकरिता तू वाल्मीकीच्या आश्रमात घेऊन जा, व त्या ज्ञानी ऋपीस माझा असा निरोप साग की - हे महर्षे, स्वर्गादि सर्व क्षणिक व सासारिक मुखास तुन्छ समजणाऱ्या या नम्र व शीलसपन्न राजास आत्मतत्त्वाचा उपदेश कर ह्मणजे त्याच्या योगाने जन्म जरा, बाल्य, रोग, तृष्णा इत्यादिकाच्या योगाने प्राप्त होणाऱ्या सासारिक दु. ग्वाने व्याकुळ झालेल्या या राजास मोक्ष प्राप्त होईल. आसरे, देवाधि- देवाचा हा निरोप घेऊन मी पुनरपि राजाकडे आलो, त्याच्या सह वाल्मीकी- कडे गेलो व त्या महर्पीस स्वामीची इच्छा कळविली. तेव्हा त्या पुण्यवान् ब्राह्मणाने राजास प्रमाने अनामय प्रश्न केला असता अरिष्टनेमि ह्मणाला- भगवन्, आपल्या दर्शनाने मी धन्य झालो व यातच माझे कुशल आहे. महाराज, या ससारदुखातून मी मुक्त कसा होईन, ते मला सागा.' असा मोठ्या काकुळतीने केलेला प्रश्न ऐकून ते दयासागर मुनि म्हणाले - राजा, मी तुला रामायण सागतो. ते ऐकून तू त्याचा अर्थ मनात आण व मनन कर. ह्मणजे जिवन्मुक्त होशील. मी तुला वसिष्ट व राम याचा सवाद सागतो. ही शुभ कथा ह्मणजे मोक्षाचा एक उपायच आहे. त्यावर राजा म्हणाला-राम हा कोण होता? तो बद्ध होता की मुक्त ? हा प्रश्न ऐकून