पान:बृहद्योगवासिष्ठसार भाग १ ला (Bruhdyogavasishthsar Part 1).djvu/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्टसार. पुनरपि कधी । स्मरण होणार नाही, इतक्या दृढपणे जगास 'विसरणे हेच जीवन्मुक्तीचे लक्षण व स्वरूप आहे. लक्षण ह्मणजे ओळखण्याचे चिह्न व स्वरूप ह्मणजे आकार, असा या दोन शब्दाचा स्थूल अर्थ येथे सम- जावा. पण ही स्थिति प्राप्त होणे अतिशय कठिण आहे. ह्मणूनच अद्वैत सिद्धात सर्वास पटत नाही व त्यामुळेच विशिष्टाद्वैत, शद्धाद्वैत, द्वैत, केवळ भक्तिमार्ग, केवल कर्ममार्ग, नास्तिकाचा सघ व केवळ विषयासक्त उन्मार्गी लोकाचा समूह हे सर्व या जगात अस्तित्वात आहेत. जगात जेवढे ह्मणून अनुभवास येणारे पदार्थ आहेत त्याचा अत्यत अभाव आहे झणजे मनुष्याच्या शिगाप्रमाणे किवा पुच्छाप्रमाणे ते तिन्ही काळी विद्य- मान नाहीत, असा दृढ बोध झाल्यावाचून त्या अवस्थेचा अनुभव येणे शक्य नाही. पण तो बोध दृढ कसा होणार? त्याला उपाय कोणता? ह्मणून विचारशील तर सागतो. आत्म्याचे यथार्थ स्वरूप जाणणे हाच त्याचा उपाय आहे. यास्तव उपायाच्या योगाने आत्मसाक्षात्कार सपा- दन केला पाहिजे. या शास्त्राचे श्रवण केले असता त्याचा उपाय समजतो. हे जग जरी दिसत आहे तरी ते वस्तुतः नाही, असा बोध होणे अशक्य समजू नकोस. कारण अशी अशक्य गोष्ठही सुशक्य कर- ण्याचे सामर्थ्य या शास्त्रामध्ये आहे चित्तवृत्ति आत्म्यामध्ये स्थिर करून तिला द्वैतमय बाह्य पदार्थापासून दूर करणे हाच दृश्य नाहीसे करण्याचा उपाय आहे, व तो साध्य झाल्यास तीच परम शाति उत्पन्न झाली, असे जाणावे. पण असे न करिता जे बिचारे आत्म्यावाचून इतर पदार्थाचे सविस्तर वर्णन करणाऱ्या शास्त्रातच लोळत रहातात त्यास अनत कोटी कल्पातही ती शाति मिळणे शक्य नाही. त्यातील काही शास्त्रे प्राण्याच्या उत्कर्षाचे उपाय सागतात, हे खरे पण केवल कर्म, भक्ति, तर्कतः पदार्थाचे विवरण इत्या- दिकाच्या योगाने फार तर या दुःग्वमय ससारातील एकादे जरा कमी दु ग्याचे स्थान मिळणे शक्य आहे. दुःखाचा सर्वथैव नाश होणे शक्य नाही. प्राण्याच्या अनत वासना हेच त्याच्या जन्माचे बीज आहे व जन्म हे दुःखाचे घर आहे. यास्तव बीजच नाहीसे केले पाहिजे. अर्थात् वासनांचा सर्वस्वी त्याग केला पाहिजे. या वासनाच्या त्यागासच उत्तम मोक्ष ह्मणतात. यास्तव कर्म, उपासना, वेदांतश्रवण, मनन इत्यादि साध-