१. वैराग्यप्रकरणं-सर्ग ४. हाने राम नगरांतून बाहेर पडला. अनेक ब्राह्मणास दाने देत, अनेक स्त्रीपुरुषांचे आशीर्वाद घेत व अनेक रमणीय प्रदेश पहात तो अरण्यातून मार्ग आक्रमण करू लागला. आपल्या कोसल देशापासूनच तो, स्नान, दान, तप व ध्यान करून प्रत्येक नदीचे पवित्र तीर, वने, देव व मुनि याची स्थाने, रमणीय अरण्ये, पर्वताचे कडे, मदाकिनी, चंद्रभागा, यमुना, सरस्वती, शुतुद, सरयु, नर्मदा, गोदावरी, कृष्णावेणी, सिधु, इत्यादि नद्या, प्रयाग, पुष्कर, धर्मारण्य, नैमिष, गया, श्रीगिरि, केदार इत्यादि स्थाने, मानस, चक्रमसर, उत्तरमानस इत्यादि सरोवरे, अग्नितीर्थ, महातीर्थ इत्यादि तीर्थे, स्वामीकार्तिक, शालग्राम, हरीची व हराची चवसष्ट स्थाने, नानाप्रकारच्या आश्चर्यानी भरलेले चारी समुद्राचे तट, विध्य, मदर, सह्य इत्यादि पर्वत, व मोठमोठे राजर्षि, ब्रह्मर्षि, तापसी, कुलगुरु ब्राह्मण, इत्यादिकाचे पवित्र आश्रम याचे दर्शन घेत चालला. आपल्या प्रिय भ्रात्यासह त्याने सर्व' पृथ्वीवर पर्यटन केले. काही काही अति रमणीय स्थळे तर त्याने दोनदोनदा पाहिली. आणि येणेप्रमाणे आपल्या मनाची हौस पुरी करून घेऊन बऱ्याच दिवसानी तो पुण्यशील महात्मा स्वनगरास परत आला ३. सर्ग ५-येथे, तीर्थयात्रा करून परत आलेला राम स्वगृहात प्रविष्ट होऊन आपल्या पिता, माता इत्यादि सुहृदास आनदित करिता झाला, असें सागून शेवटी त्याची दिनचर्या वर्णिली आहे. रामाच्या नगरप्रवेशसमयी अयोध्येतील लोकानी फारच मोठा उत्सव केला. पूर्णिमेच्या चद्राप्रमाणे सर्वास एकसारिखा अह्लाद देत तो आ- पल्या गृहात गेला. पिता, माता, गुरु, आप्त, मित्र, बाधव, ब्राह्मण, कुलवृद्ध इत्यादिकास नमस्कारादि योग्य उपचाराच्या योगाने त्याने सतुष्ट केले. त्यावेळी त्या राजगृहात सर्वत्र आनद पसरला होता. हर्षाने एकमेकाशी बोलणान्या सर्व जातींच्या व सर्व दर्जाच्या लोकाच्या ध्वनीनी ते भव्य गृहही त्यावेळी दुमदुमून गेले. राम यात्रा करून सुखरूप परत आल्यामुळे राजाने आपल्या राज्यात आठ दिवस मोठा उत्सव केला. त्यानतर तो आपल्या नगरात आनदाने राहू लागला. प्रसगविशेपी तो आपल्या मातोश्रीस, पित्यास व कधी कधी श्रीगुरूसही य त्रेत पाहिलेले चमत्कार सागत असे. राम प्रत्यही प्रातःकाळी उठून सध्योपासनेनतर
पान:बृहद्योगवासिष्ठसार भाग १ ला (Bruhdyogavasishthsar Part 1).djvu/१९
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही