X बृहद्योगवासिष्ठसार. आसनावरून उठून त्या श्रेष्ट ब्राह्मणास सामोरा गेला. क्षात्र व ब्राह्म अशा दोन्ही प्रकारच्या तेजाने व्याप्त झालेले त्याचे ते शरीर पाहून राजास-हा दुसरा सूर्यच आहे की काय-असा भ्रम झाला. त्याच्या पिक- लेल्या व खाद्यावर लोळणाऱ्या जटा, त्रिकाल स्नानादि-नियमामुळे व तप. श्चर्येमुळे पिवळट दिसत होत्या व त्यामुळे तर त्याच्या शरीरास अधिकच शोभा आली होती. त्याची मुद्रा जरी अति शात दिसत होती तरी रमणीय, जरा भयप्रद, प्रसन्न, गभीर व धीर अशा तेजाने व्यापिलेल्या त्या शरीराकडे सहज पहावत नसे. त्या मुनिवर्याच्या हातांत एक कमडल मात्र होता. असो, दुरूनच दृष्टादृष्ट होताच राजाने त्यास साष्टांग प्रणाम केला. तेव्हा त्यानेही त्यास योग्य आशीर्वाद दिला. त्यानतर वसिष्ठादि मुनीनीही त्याचे स्वागत व योग्य सत्कार केला. पुढे त्यास बरोबर घेऊन राजा सभास्थानी जाऊ लागला असता ह्मणाला, "प्रभो,भापल्या या आकस्मिक येण्याने आमन्यावर मोठाच अनुग्रह झाला आहे. आपल्या चरणकम- लाच्या दर्शनाने चित्तास परमानंद होत आहे. आज आमी धन्य झालो." वसिष्ठादि मुनि व इतर ब्राह्मणादिही अशाच गोड गोड शब्दांनी त्याचे गौरव करू लागले. इतक्यांत ते सर्व सभास्थानी आले, राजाने त्या अतिथीस उत्तम आसनावर बसवून वसिष्टाच्या सागण्याप्रमाणे त्याची अादिकाच्या योगाने पूजा केली. विश्वामित्रानेही राजास व इतर मान्य पुरुषास कुशल प्रश्न केले व ते सर्व सभासद एक क्षणभर आनदसागरात निमग्न झाल्याप्रमाणे दिसू लागले. त्या अतिथीस थोडी विश्रांति घेऊं देऊन, राजा शातपणे हात जोडून ह्मणाला-महाराज, मरावयास टेकलेल्या माणसास अमृत मिळाले असतां, अधास नेत्र आले असतां, अपुत्रास पुत्र झाला असता, शेते वाळून जात असताना वृष्टि झाली असता व स्वप्नांत पाहिलेल्या इष्ट वस्तूचा उठल्याबरोबर प्रत्यक्ष लाभ झाला असता जसा ५ काद्यास आनंद होतो तसाच आनंद आज मला आपल्या आगमनाने झाला आहे. पूर्वी राजर्षि असून तपाच्या योगाने अद्धत ब्राह्मण्य सपादन केलेल्या आपल्या चित्तांत काम, भय, क्रोध इत्यादिकातील एकही दोप असणे शक्य नाही. पण असे असतानाही ज्याअर्थी आपण मज दीनावर अनुग्रह करण्याकरितां आला आहां त्याअर्थी " मी आपले कोणतें काम करू ?" असा प्रश्न विचारल्यावांचून माझ्याने रहावत नाही. आप या-
पान:बृहद्योगवासिष्ठसार भाग १ ला (Bruhdyogavasishthsar Part 1).djvu/२०
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही