१. वैराग्यप्रकरणं-सर्ग ७. सारिखें सत्पात्र मिळणे हे थोड्याशा पुण्याचे लक्षण खचित नव्हे. गगाजलाच्या स्नानाने पवित्र व तृप्त झालेल्या पुरुषाप्रमाणे आपल्या दर्श- नाने तृप्त झालेल्या माझ्या चित्तात आनंद मावत नाही. करितां आपण कोणत्या उद्देशाने या गृहास पवित्र केलेत ते मन मोकळे करून सागा. आपल्या सारिख्यास अदेय (न देण्यासारिखे ) असे मजजवळ काही नाही. आपले कोणतेही जरी कार्य असले तरी ते मी केलेच आहे, असे समजून मनात काही विचार न करिता मला सागा. आपण माझे परम दैवत आहां, असे मी समजतो. राजाचे हे उदार भाषण ऐकून विश्वामित्र मुनि आनंदित झाला ६. सर्ग ७-विश्वामित्र मुनींनी राजाच्या औदार्याची प्रशसा करून यज्ञास विघ्ने की येतात ते सागितले व विघ्नकर्त्या राक्षसाचा वध करण्याकरिता र.मास मजबरोबर पाठिव अशी याचना केली, इतका कथाभाग या सर्गात आहे. आणि त्या राजास ह्मणाला-महाकुलात उत्पन्न झालेल्या व या श्रीव- सिष्ठाच्या आज्ञेत राहणा-या तुला असे बोलणे योग्यच आहे. माझ्या येण्याचा उद्देश मी सागतो तो ऐक. हे गोब्राह्मणपालका, मी सिद्धीकरितां धर्माचरण करू लागलो की घोर राक्षस मला विघ्न करितात. मी यज्ञास आरभ केला की ते येऊन त्याचा विध्वस करितात. पवित्र वेदीस रक्त- मासानी भ्रष्ट करितात. एकदा दोनदाच नव्हे तर हा प्रकार अनेकदा उडला आहे. त्यामुळे अतिशय कटाळून त्या राक्षसाधमाचा नाश करवि. ण्याच्या हेतूने मी आज तुजकडे आलो आहे. त्यास शाप देऊन भस्म करून टाकण्याचे सामर्थ्य जरी माझ्या ठायी आहे तरी तप क्षीण होईल या भीतीने मी क्रोध करण्याचे सोडिले आहे. राजा तुला चार पुत्र आहेत. त्यातील महा बलाढ्य राम राक्षसास मारून माझ्या यज्ञाचे रक्षण करण्यास समर्थ आहे तरी त्या तुझ्या ज्येष्ठ व सोळा वर्षाच्या आतच असलेल्या बालकास माझ्या स्वाधीन कर. मी त्याचे रक्षण करीत अस- ताना राक्षस त्यास काही करू शकणार नाहीत. त्या तुझ्या पत्राचे मी इतके कल्याण करून सोडीन की त्यामुळे तो त्रिभुवनास पूज्य होईल. रामावाचून दुसरा कोणी वीर त्याचे उन्मूलन करण्यास समर्थ नाही, हे मला ठाऊक आहे. खर व दूषण याचे ते मारीचादि पापी अनुचर महाघोर व पराक्रमी आहेत. पण रामाचे बाण ते सहन करू शकणार नाहीत. यास्तव हे
पान:बृहद्योगवासिष्ठसार भाग १ ला (Bruhdyogavasishthsar Part 1).djvu/२१
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही