१. वैराग्यप्रकरण-सर्ग ९. कोठ जात नाही; येत नाहीं; काय होते ते सांगत नाही. त्यास पोटभर जेवावयाचेही सामर्थ्य राहिलेले नाही. अशा अवस्थेत त्यास राक्षसांशी लढण्याकरितां नेणे, किंवा पाठविणे ही दोन्ही कृत्ये अयोग्य आहेत. पत्रसुखापुढे व्यवहारांतील दुसरी सर्व सुखे तुच्छ असतात. रामाचा व माझा वियोग झाल्यास मी जिवतही राहू शकणार नाही. त्याच्या मातेची व अनुजांचीही तीच गत होईल. वृद्धावस्थेत अनेक दैवी उपाय करून मला हे चार पुत्र लाभले आहेत. त्यांतील राम तर माझा बाहेर फिरणारा प्राणच आहे. तो राक्षसाशी लढावयास गेल्यावर माझे शरीर कसे राहील ? ते राक्षसही सामान्य नव्हेत. रावणाच्या आज्ञेनेंच ते तुमच्या यज्ञात विघ्न करीत असतील. रावणाने तर त्रिभुवनास त्राहि त्राहि करून सोडिले आहे. देव व गधर्वही ज्याच्यापुढे उभे राहू शकत नाहीत त्याच्याशी किवा त्याच्या अनुयायीशी मी किवा माझा पुत्र कसा लढणार ? महाराज माझ्यावर हा एक मोठाच प्रसग आला आहे. पुत्राने रोगी व्हावे, मी वृद्ध व पुत्रसुखेच्छ असावे, व इतक्यातच आपण अशी अशक्य याचना करावीत हे माझ्या दुभोग्याचेच फळ होय. सुबाहु व मारीच या सुंदोपसुद-पुत्राशी लढण्याकरिता रामास पाठवावे, असे माझी मनोदेवता मला सागत नाही. पण त्यातूनही आग्रह करून किवा तप.सामर्थ्याने जर आपण त्यास येथून नेलेत तर मी मेलोच, असे समजावे. याप्रमाणे अति मृदु वाणीने बोलून तो रघुकुलनन्दन, काय करावे याचा निश्चय न करवल्यामुळे चितातुर होऊन राहिला ८. सर्ग९--येथे, विश्वामित्राचा कोप व वसिष्ठानी राजास त्याचे तप व बल किती आहे ते सागून राजाचे केलेले समाधान याचा विस्तार केला आहे - राजा दशरथाची ती दीन अवस्था पाहून व भापण ऐकून विश्वामित्र मुनीस क्रोध आला व तो महात्मा ह्मणाला,-राजा, एकदा " करितों" असे ह्मणून मागून " नाही" ह्मणणें तुला शोभत नाही. तू सिहासारिखा शूर असून असा हरिणासारखा भीरु का होतोस ? रघूच्या कुलातील राजाला हे उचित नव्हे. चद्राचे किरण कधीही उष्ण होत नाहीत. मग तुझ्याच स्वभावात असे अतर का पडावे? अथवा मला अधिक बोलून काय करावयाचे आहे. तुला जर रामास पाठवावयाचे नसेल तर मी आल्या मार्गाने परत जातो. आपली प्रतिज्ञा पूर्ण न करिता तूं सुखी
पान:बृहद्योगवासिष्ठसार भाग १ ला (Bruhdyogavasishthsar Part 1).djvu/२३
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही