१. वैराग्यप्रकरण-सर्ग ११. २१ सर्ग ११-विश्वामित्राच्या आशेनें रामास सभेत आणवून राजाने त्याचे आश्वासन केले व 'तुझ्या मानसिक व्यथेचे कारण काय ' ह्मणून त्याने व वसिष्ठ- विश्वामित्रानी विचारिलें, असें येथे वर्णन केले आहे. हे सर्व वर्तमान ऐकून विश्वामित्र मुनि ह्मणाले-राजा, असे असेल तर रामास त्वरित येथे आणीव. त्यास हा मोह आपत्तीमुळे किंवा आसक्तीमुळे । झालेला नसून तो महाफल देणारा बोध आहे, असे समज. कारण विवेक व वैराग्य-संपन्न पुरुषास होणारा मोह बोधास कारण होत असतो. यास्तव त्याला मोह असे न ह्मणता बोध असेच झटले पाहिजे. तो येथे येऊ दे. आमी त्याचा हा मोह एका क्षणात नाहीसा करितो, पहा. मोह गेला की तो परमपदी विश्राति घेईल, व त्यामुळे अमृतपान केल्याप्रमाणे त्याच्या शरीरावर काति येईल; तो पुष्ट होईल, त्याच्या व्यवहारात सत्य आढळू लागेल; त्याची बुद्धिमत्ता प्रकट होईल, त्याच्या मनास परम समाधान होईल व त्यामुळे तो तुझा सर्वास पूर्वीप्रमाणेच किबहुना त्याहून अधिक आनददायी होईल. मुनीचे हे भाषण ऐकून राजास बरे वाटले, व त्याने रामास आणण्याकरितां एकामागून एक असे अनेक दूत पाठविले. पण इतक्यात स्वतःरामच पित्याच्या दर्शनास जाण्याच्या उद्देशाने आपल्या आसना- वरून उठला. आणि लक्ष्मण, शत्रुघ्न व काही सेवक यास बरोबर घेऊन पितृद- शनार्थ निघाला. राजसभेत प्रवेश करिताच, अनेक प्रकारच्या ऐश्वर्याने मडित झालेला राजा दशरथ त्याच्या दृष्टी पडला व वसिष्ठ, विश्वामित्र आणि राजा दशरथ यानीही येत असलेल्या रामास दुरून पाहिले. धैर्य, शाति, औदार्य, विनय, इत्यादि सर्व दैवी गुणानी सपन्न असलेला तो तरुण बालक एकाद्या कृतकृत्य व परमानदपूर्ण निःस्पृह वृद्धाप्रमाणे दिसत होता. जवळ येताच त्याने प्रथम पित्याच्या व नतर वसिष्ठविश्वामित्राच्या चरणा वर आपले सुदर मस्तक ठेविले. ब्राह्मणास नमस्कार करून इतर सभास- दाचाही त्याने यथायोग्य सत्कार केला. विश्वामित्रादिकानी आशीर्वाद दिल्यावर राजाने रामास आपल्या जवळ बसविले व त्याच्या अगावरून हात फिरविला. रामाप्रमाणेच लक्ष्मण व शत्रुघ्न यानी सर्वास क्रमाने नमस्कार केले व तेही राजाच्या सिहासनाजवळ बसले. काही वेळ रामाच्या मुखाकडे पाहून राजा म्हणाला, “पुत्रा, तू विवेकी आहेस व सर्व काही तुला अनुकूल आहे. मग रूक्ष मनाने खिन्न का होतोस ! या
पान:बृहद्योगवासिष्ठसार भाग १ ला (Bruhdyogavasishthsar Part 1).djvu/२५
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही