पान:बृहद्योगवासिष्ठसार भाग १ ला (Bruhdyogavasishthsar Part 1).djvu/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१. वैराग्यप्रकरणं-सर्ग १४. क्ष्मीचे लालसी लोक, ती त्यांस वारवार लाथा मारून दूर उडवून देत असतांनाही पुनः निर्लज्ज होऊन तिच्या मागें कां धांवत सुटतात !! अथवा त्यात आश्चर्य तरी कसले ! एकादी अपूर्व वस्तु पाहिली तर याचे आश्चर्य. लक्ष्मी व लक्ष्मांचे प्रेमी यांची ही धावपळ तर प्रत्यहीं, प्रति- ॥णी, व प्रायः सर्वत्र चालली आहे. तेव्हा हीच गोष्ट खरी की जग बह- लें आहे; त्यास ही रमणीय वाटते; तिने पाडलेला मोह अनिवार्य झाला वहे. त्यामुळे तिचे दोषही त्यास गुण वाटतात व ते दोष आहेत, असे कोणी सागू लागल्यास तेंही त्यास आवडत नाही १३. गर्ग १४-व्याधि, रोग, जरा इत्यादिकांनी प्रस्त व कामादिकाच्या योगाने कलु- षित झालेले मूर्खाचें जीवित व यौवन याची येथे निंदा केली आहे. असो; ज्यांची फारशी गरज नाही अशा विषयात आसक्त होऊन, द्रव्य च त्यांच्या प्राप्तीचे साधन आहे, असे समजून, पृथ्वीच्याच काही अंशास दव्य कल्पून, त्याचे मूल्य आपल्या कल्पनेनेच वाढवून, मग आसपा- सच्या इतर लोकाप्रमाणे श्रीमान् होण्याची मनुष्य प्राणी इच्छा करितो व त्यामुळे त्याने ह्या ससारास भयकर करून सोडले आहे. पण ही सर्व खटाटोप ज्याच्या बलावर करिता येते त्या आयुष्याची कितीशी शाश्वती आहे, ह्याचा कोर्णाच विचार करीत नाही. एकाद्या पानाच्या टोकावर जाऊन राहिलेल्या जलबिंदूप्रमाणे आयुष्य चपल आहे. ते अकस्मात् शरी- रास सोडून जाते. याचे चित्त विषयाच्या आशानी जर्जर झालेले असते व ज्यास सर्वोत्तम आत्मविवेक होत नाही त्यास हे आयुष्य फार केश देते, व जे आत्मविवेकी आहेत; ज्यास लाभ व अलाभ सारिखेच वाटतात आणि जे ज्ञानाने कृतकृत्य होऊन शातचित्त झाले आहेत त्यास ते सुख देते. पण, हे मुने, असे भाग्यवान् जन आहेत कोठे ? प्रायः सर्व जन या देहादि वस्तूवर आस्था ठेऊन, बस्स, शरीरास " येन केन प्रका- रेण" मुखी करणे यातच सर्व काही आहे. पुरुषार्थ पुरुषार्थ ह्मणून ज्यास ह्मणतात तो हाच. आत्मा, आत्मा, आत्मा झणून ज्याच्या विषयी शास्त्रात कठघोष केलेला असतो, तो आत्मा ह्मणजे शरीरच. त्याचा नाश होणे या- । सारिखी हानि. नाही.- असे ह्मणतात व त्यामुळे केवढ्याही आयुष्याने त्यांची. तृप्ति होत नाही. वायूची मोट बाधण्यास, आकाशाचे तुकडे करण्यास व लाटाची माळ ओवण्यास तयार होणेही योग्य होईल