कर्मयोग, भक्तियोग व राजयोग. प्रसिद्ध स्वामी विवेकानद यानी युरोप व अमेरिकेत वेगवेगळ्या योगांवर दिलेल्या व्याख्यानापैकी वरील तीम योगांवर वेगवेगळ्या तीन विद्वानांनी मराठीत लिहिलेले हे तीन ग्रंथ एकत्र बांधलेले आहेत. किंमत १ रुपाया. ज्ञानयोग. प्रसिद्ध स्वामी विवेकानद यांनी इग्लड व अमेरिकेंत ज्ञानयोगावर दिलेली व्याख्याने अत्यत लोकमान्य झाली होती, त्याचे हे भाषातर केवळ मराठी वाचकाच्या सोईकरिता रा. रा. श्रीकृष्ण नीळकठ चापेकर यानी केले आहे. ह्या अथात–१ मनुष्यास धर्माची आवश्यकता, २ सर्वसम्राह्य धर्माची कल्पना व तिचे अत्युच्च स्वरूप, ३ वस्तुपुरुष व भ्रान्तिपुरुष, ४ माया, ५ माया आणि ईश्वरविषयक कल्पनेचा विकास, ६ माया आणि मोक्ष, ७ अव्यक्त ब्रह्म आणि साकार ब्रह्म, ८-९ विश्वविचार १०-११ पुनर्जन्मवाद, १२ आत्म्याचे अमरत्व, १३ भिनत्वात ऐक्याचा प्रत्यय. याप्रमाणे १३ विषय आहेत. किंमत १॥ रुपये. सूचना-आमच्या किताबखान्यात सर्व प्रकारचे मराठी ग्रंथ, व शालोष- योगी पुस्तके व इतर सामान एकाच भावाने मिळतात. लायब्ररी व शाळामास्तर यास योग्य व भरपूर कमिशन दिले जाते. श्रीमत गायकवाड सरकार, डेक्कन व्हरनाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी, सत्कार्योत्तेजक सभा, इत्यादि सस्थानी प्रसिद्ध केलेल्या ग्रंथाची एजन्सी आमच्याकडे आहे. पुस्तकास लागणारा वाजवी व्ही. पी. व टपालखर्च किमतीवर चढविला जाईल. सर्व पत्रव्यवहार खालील पत्त्यावर करावा कांही खुलासा पाहिजे असल्यास उत्तराकरिता टिकिट पाठवावे. दामोदर सांवळाराम आणि मंडळी. ग्रंथ संपादक मंडळीचा कितावखाना--ठाकुरद्वार-मुंबई.
पान:बृहद्योगवासिष्ठसार भाग १ ला (Bruhdyogavasishthsar Part 1).djvu/८
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही